वाद सोडून खेळावरच लक्ष केंद्रित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

रांची - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी दुसऱ्या कसोटीतील "डीआरएस' वाद मिटवताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) यांनी दाखवलेल्या समजूतदारपणाचे कौतुक केले. त्याचवेळी कसोटी सामना संपल्या संपल्या वाद विसरून खेळावरच लक्ष केंद्रित करण्यावर आम्ही भर दिला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ सोमवारी रांचीला दाखल झाला. त्यानंतर मंगळवारी त्यांनी येथे सराव केला. सरावापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना कुंबळे यांनी दुसरी कसोटी जिंकून भारतीय संघाने मालिकेत पुनरागमन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, ""दुसरा कसोटी सामना आमच्यासाठी निर्णायक होता. तो जिंकून भारतीय खेळाडूंनी मालिकेत केलेले पुनरागमन निश्‍चितच समाधान देणारे होते. चारच गोलंदाजांसह खेळताना खूप कमी वेळा संपूर्ण दिवस त्यांच्याकडून अचूक मारा बघायला मिळतो. पण, दुसऱ्या कसोटीत प्रत्येक गोलंदाजाने दाखवलेली तडफ लक्षणीय होती. आश्‍विनचा दर्जा सतत उंचावत आहे. ईशांत आणि उमेश यांनीही कमालीची अचूकता राखली. जडेजाची टप्पा आणि दिशेवर हुकूमत आहे. त्याचवेळी राहुल, पुजारा आणि रहाणे यांची फलंदाजी महत्त्वाची होती. दिवसाच्या महत्त्वाच्या सत्रात विकेट राखून ठेवताना पुजारा-रहाणे यांनी केलेली फलंदाजी नक्कीच निर्णायक होती.''

ऑस्ट्रेलियाचाही सराव
सकाळी रांचीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन संघाने सराव केला. नॅथन लायन सरावाला आला होता तरी त्याने क्षेत्ररक्षणाचा सराव केला नाही. लायनच्या बोलिंग करायच्या बोटालाच दुखापत झाली आहे. ज्याने पाहुण्या संघाच्या चिंता वाढल्या आहेत. लायनची दुखापत शंभर टक्के बरी झाली नसली, तरी तो संघात नक्की असेल फक्त त्याला जोड द्यायला मग ग्लेन मॅक्‍सवेलला जागा दिली जाईल असे समजते.

रांची स्टेडियमची विकेट एस. बी. सिंग तयार करत आहेत. रांचीच्या मैदानावरची माती काहिशी काळपट आहे. योग्य प्रमाणात पाणी दिले नाही, तर काळ्या मातीला मोठ्या प्रमाणावर तडे जाऊ शकतात हे जाणून सिंग खेळपट्टीवर झारीने पाणी मारून नंतर ती हलक्‍या बारदानाने झाकत होते. सामन्याला दोन दिवस असताना खेळपट्टीवर गवत दिसत असले, तरी ते आदल्या दिवशी काढले जाईल. पहिल्या दोन कसोटीपेक्षा येथील खेळपट्टी फलंदाजीला चांगली राहील असा अंदाज आहे.

Web Title: Leaving the debate to focus on game