पाक खेळाडूंना आयपीएलमध्ये संधी द्या - ऋषी कपूर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

मुंबई - आयपीएलमध्ये जगभरातील सर्व खेळाडूंना संधी दिली जाते; मग पाकिस्तानच्या खेळाडूंनाही खेळू द्या, अशी मागणी अभिनेते ऋषी कपूर यांनी केली आहे.

मुंबई - आयपीएलमध्ये जगभरातील सर्व खेळाडूंना संधी दिली जाते; मग पाकिस्तानच्या खेळाडूंनाही खेळू द्या, अशी मागणी अभिनेते ऋषी कपूर यांनी केली आहे.

दहाव्या मोसमाची आयपीएल सुरू होत असताना ऋषी कपूर यांनी ट्विटरवरून पाकिस्तानी खेळाडूंसाठी बॅटिंग केली आहे. अफगाणिस्तानचे महंमद नबी व रशीद खान यांना गतविजेत्या हैदराबादने आपल्या संघात घेतले आहे. सर्व वाद बाजूला ठेवून आपल्यापेक्षा लहान असलेल्या देशातील खेळाडूंना संधी द्यावी, असे म्हणताना ऋषी कपूर यांनी, फिर मॅच होगा, हम बडे लोग हैं, असे शब्द आपल्या ट्विटमध्ये वापरले आहेत.

सुरवातीच्या आयपीएलमध्ये काही पाकिस्तानी खेळाडू खेळले होते; परंतु मुंबई हल्ल्यानंतर त्यांच्या कोणत्याही खेळाडूला आयपीएल फ्रॅंचाईजीने आपल्या संघात घेतले नाही. त्यानंतर लिलावाच्या यादीतूनही पाक खेळाडूंना वगळण्यात आलेले आहे.