क्रिकेट: मनीष पांडेला दुखापत; दिनेश कार्तिक भारतीय संघात 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 मे 2017

चँपियन्स करंडक स्पर्धेसाठी भारताचा संघ : 
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्‍य रहाणे, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), युवराजसिंग, केदार जाधव, हार्दिक पांड्या, आर. आश्‍विन, रवींद्र जडेजा, महंमद शमी, उमेश यादव, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रित बुमराह, दिनेश कार्तिक.

नवी दिल्ली : यंदाच्या 'आयपीएल'मध्ये गुजरात लायन्ससाठी चांगली कामगिरी करणारा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक याला चँपियन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. मूळ संघात निवड झालेल्या मनीष पांडेला दुखापत झाल्याने त्याला संघातून बाहेर जावे लागले आहे. चँपियन्स करंडक स्पर्धेसाठी कार्तिकला राखीव खेळाडूंमध्ये स्थान मिळाले होते. 

मनीष पांडे कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध बुधवारी झालेल्या सामन्यापूर्वी सराव करत असताना पांडेला दुखापत झाली. यामुळे त्याला चँपियन्स करंडक स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. 

कार्तिकने आतापर्यंत 74 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, यापैकी 24 सामन्यांमध्येच तो यष्टिरक्षक होता. 2013 मध्ये भारताने चँपियन्स करंडक जिंकला, त्या संघामध्येही कार्तिकचा समावेश होता. यापूर्वी त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2014 मध्ये आशिया करंडक स्पर्धेत खेळला होता. 

गेल्या दोन मोसमांमध्ये कार्तिकने देशांतर्गत स्पर्धांत चांगली कामगिरी केली आहे. रणजी स्पर्धेत कार्तिक तमिळनाडूकडून खेळतो. 2016-17 च्या मोसमात त्याने 54.15 च्या सरासरीने 704 धावा केल्या. यंदाच्या 'आयपीएल'मध्ये गुजरात लायन्सकडून दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा त्याने केल्या. 

चॅम्पियन्स