डकवर्थ-लुईस आणि मोईन अलीमुळे इंग्लंडचा विजय

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

लंडन : पावसाचा व्यत्यय आणि त्यानंतर डकवर्थ लुईस नियम लागू झाल्याने चौथ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडीजवर 6 धावांनी विजय मिळविला. पण, यात मोईन अलीच्या खेळीला विसरता येणार नाही.

आधीच्या सामन्यातील शतकी खेळीनंतर याही वेळी मोईनचा इंग्लंडसाठी धावून आला. वेस्ट इंडीजच्या 356 धावांना उत्तर देताना इंग्लंडच्या फलंदाजांनी आभाळाकडे पाहूनच पहिल्या चेंडूपासून फटकेबाजीला सुरवात केली होती.

षटकामागे कधी सहा, तर कधी आठच्या धावगतीने त्यांचा डाव सुसाट सुरू असतानाच त्यांचे पाच गडी कधी बाद झाले हे त्यांनाच कळले नाही. त्यामुळे एकवेळ त्यांचा डाव एकवेळ 5 बाद 181 असा अडचणीत आला होता. त्या वेळी जोस बटलर आणि मोईन अली यांच्या अर्धशतकी भागीदारीने सावरला गेला. या जोडीने डाव सावरतानाच धावांच्या वेगाकडेही लक्ष दिल्यामुळे त्यांना विजय मिळविता आला.

पावसामुळे खेळ थांबला तेव्हा डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे इंग्लंड सहा धावांनी पुढे राहिले. तेच निर्णायक ठरले. 

संक्षिप्त धावफलक :

वेस्ट इंडीज : 50 षटकांत 5 बाद 356 (एलिस लुईस 176 -17 चौकार, 7 षटकार, जेसन होल्डर 77, जेसन महंमद 46, ख्रिस वोक्‍स 3-71)

पराभूत वि. इंग्लंड लक्ष्य (35.1 षटकांत 253) 5 बाद 258 (जेसन रॉय 84 -66 चेंडू, 11 चौकार, 2 षकार, जेमी बेअरस्टॉ 39, जोस बटलर नाबाद 43, मोईन अली नाबाद 48, अल्झारी जोसेफ 5-56)