क्रिकेट: ऍरॉन फिंच पुन्हा दुखापतग्रस्त; बदली खेळाडू संघात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

 सिडनी : दुखापतींनी त्रस्त झालेला सलामीवीर ऍरॉन फिंचसाठी राखीव खेळाडू म्हणून पीटर हँड्‌सकोम्बला ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात पाचारण करण्यात आले आहे. भारताविरुद्धच्या महत्त्वपूर्ण मालिकेच्या सलामीच्या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाला हा धक्का बसला आहे. 

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये येत्या रविवारपासून पाच सामन्यांच्या मालिकेस सुरवात होत आहे. धडाकेबाज सलामीवीर फिंचला या दौऱ्यापूर्वीच दुखापत झाली होती. त्यातून सावरत असतानाच गुरुवारी (ता. 14) झालेल्या सराव सामन्यामध्ये फिंचची दुखापत पुन्हा उफाळून आली. यामुळे मालिकेतील पहिल्या काही सामन्यांसाठी फिंचला विश्रांती दिली जाऊ शकते. यासाठी हँड्‌सकोम्बला पाचारण करण्यात आले आहे. 

बांगलादेशमध्ये नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेमध्ये हँड्‌सकोम्ब ऑस्ट्रेलियन संघात होता. ही मालिका संपल्यानंतर तो नुकताच मायदेशी परतला होता. त्यानंतर आता पुन्हा त्याला भारतात दाखल होण्यास सांगण्यात आले.

रविवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी हँड्‌सकोम्ब उपलब्ध असेल, असे ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने सांगितले. फिंचच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरच्या साथीत सलामीला उतरण्यासाठी हँड्‌सकोम्बशिवाय ट्रॅव्हिस हेडचाही पर्याय ऑस्ट्रेलियाकडे आहे.