राहुलला ताप, पहिल्या कसोटीस मुकणार

वृत्तसंस्था
सोमवार, 24 जुलै 2017

मुंबई : सलामीवीर के. एल. राहुल ताप आल्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असली, तरी त्याला 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीच्या वेळी ब्रेक देण्याचे ठरले आहे. 

राहुलने दौऱ्यातील एकमेव सराव सामन्यात अर्धशतक केले होते. तो तीन महिन्यांनंतर स्पर्धात्मक लढत खेळला होता. त्या लढतीनंतरही त्याने आपल्या तंदुरुस्तीबाबत शंका घेतली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेच्या वेळी त्याचा खांदा दुखावला होता. त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे तो आयपीएल, तसेच विंडीज दौऱ्यासही मुकला होता.

ताप आल्यामुळे राहुल सध्या गॉल येथेच थांबला आहे. त्याने पहिल्या कसोटीसाठी संघासोबत प्रवास करणे टाळले आहे. 

राहुलच्या अनुपस्थितीत अभिनव मुकुंद व शिखर धवन डावाची सुरवात करण्याची शक्‍यता आहे. खरे तर या मालिकेसाठी मुरली विजय आणि के. एल. राहुल ही सलामीची जोडी निवडण्यात आली होती; पण विजयने मनगट दुखावल्यामुळे दौरा सुरू होण्यापूर्वीच माघार घेतली. त्याच्याऐवजी धवन संघात आला आहे.