"एमसीसी'ची नव्या बेल्संना मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

यष्टिरक्षकाची काळजी घेऊन बनवण्यात आल्या नव्या बेल्स
लंडन - क्रिकेट सामन्यात यष्ट्यांजवळ उभे राहणाऱ्या यष्टिरक्षकांना आता बेल्स उडून दुखापत होणार नाही. क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या मेरिलीबोन क्रिकेट क्‍लबने (एमसीसी) याची काळजी घेऊन, चेंडू लागल्यावर अधिक उंच न उडणाऱ्या तसेच उडून दूर न जाणाऱ्या बेल्सच्या वापराला परवानगी दिली आहे.

यष्टिरक्षकाची काळजी घेऊन बनवण्यात आल्या नव्या बेल्स
लंडन - क्रिकेट सामन्यात यष्ट्यांजवळ उभे राहणाऱ्या यष्टिरक्षकांना आता बेल्स उडून दुखापत होणार नाही. क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या मेरिलीबोन क्रिकेट क्‍लबने (एमसीसी) याची काळजी घेऊन, चेंडू लागल्यावर अधिक उंच न उडणाऱ्या तसेच उडून दूर न जाणाऱ्या बेल्सच्या वापराला परवानगी दिली आहे.

क्रिकेट सामन्यात यष्टिरक्षक फिरकी, तर कधी कधी मध्यमगती गोलंदाजी करताना यष्ट्यांच्या जवळ उभे राहतात. चेंडूने यष्ट्यांच्या वेध घेतल्या की त्या वेगाने उसळतात आणि यष्टिरक्षकाच्या चेहऱ्यावर विशेषतः डोळ्यावर आदळतात. त्यामुळे यष्टिरक्षकांना मोठ्या दुखापतींना सामोरे जावे लागते. दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर, भारताचा सईद साबा करीम, महेंद्रसिंह धोनी असे काही यष्टिरक्षक अशा अपघातात जखमी झाले आहेत. यात बाऊचर आणि साबा करीम यांची कारकीर्दच संपुष्टात आली.

नियमात बदल
याच घटनांचा आधार घेऊन "एमसीसी'ने या नव्या बेल्सला परवानगी दिली आहे. या नव्या बेल्स पूर्वीप्रमाणेच वेगाने उसळतील; पण त्या खूप दूर जाऊन पडणार नाहीत आणि त्यांची उंचीदेखील तीन इंचांपेक्षा अधिक राहणार नाही. यासाठी दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटनमधील कंपन्यांनी अशा प्रकारच्या बेल्सचे "डिझाइन' करून पाठवले आहे. अशा बेल्सना "टीथरवाली बेल्स' असे म्हटले जाणार आहे.

नियमात बदल
यासाठी "एमसीसी'ने क्रिकेटच्या 8.3 नियमात बदल करून 8.3.4 हा नवा नियम लागू केला आहे. त्यानुसार सुरक्षेसाठी बेल्स पडल्यावर खूप दूर न जाणारे उपकरण बसवण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे उपकरण वापरल्यास बेल्स पूर्वीसारख्या दूरवर उसळणार नाहीत. अर्थात, मॅचमधील या बेल्सच्या वापरास सामना होत असलेल्या ठिकाणावरील क्रिकेट संघटना आणि मैदान अधिकाऱ्यांची परवानगी अनिवार्य असेल.

कशा असतील या बेल्स
चेंडू लागून यष्ट्या उडल्यावर बेल्स आता लांबवर जाणार नाहीत. यासाठी संशोधन सुरू असून, त्यादृष्टीने नव्या बेल्स तयार करण्यात येत आहेत. त्यानुसार ऑफ आणि लेग स्टम्पच्या बाजूवर येणाऱ्या बेल्सच्या भागाला दोरी जोडलेली असेल. त्याची एक बाजू या स्टम्प्सला "होल' पाडून बसवलेली असेल, तर दुसऱ्या बाजूला त्याला एक छोटा हलकासा चेंडू जोडलेला असेल. त्यामुळे चेंडू लागल्यावर बेल्स जेमतेम केवळ तीन इंचच उडतील आणि लोंबकळत राहतील. त्या उडून लांब जाणार नाहीत.

Web Title: mcc new bell permission