इंग्लंडचा डाव 283 धावांत संपुष्टात

वृत्तसंस्था
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

धावफलक: इंग्लंड : पहिला डाव : सर्वबाद 283 ( कूक 27, हमीद 9, रूट 15, मोईन अली 16, बेअरस्टॉ 89, स्टोक्‍स 29, बटलर 43, वोक्‍स 25, शमी 3-63, उमेश यादव 2-58, जयंत यादव 2-49, आश्‍विन 1-43, जडेजा 2-59)

मोहाली - मोहम्मद शमीच्या अचूक गोलंदाजीमुळे आज (रविवार) सकाळच्या सत्रातच तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 283 धावांत संपुष्टात आला. शमीने तीन, तर उमेश यादव, जयंत यादव आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन बळी मिळविले.

त्यापूर्वी, पहिल्या दिवशी फलंदाजीच्या क्रमवारीत बढती मिळालेल्या जॉनी बेअरस्टॉच्या झुंजार अर्धशतकामुळे भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडने पहिल्या दिवशी किमान समाधानकारक धावसंख्या उभारली. भारताची अचूक गोलंदाजी आणि इंग्लंडच्या फलंदाजांचे बेजबाबदार फटके यामुळे प्रथम फलंदाजी स्वीकारूनही इंग्लंडला पहिल्याच दिवशी आठ गडी गमवावे लागले होते. इंग्लंडने 90 षटकांत आठ गडी गमावून 268 धावा केल्या.

पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा आदिल रशीद 4, तर गॅरेथ बॅटी शून्य धावांवर खेळत होते. आज पहिल्याच षटकात शमीने रशीदला बाद केले. त्यानंतर बॅटीला पायचीत बाद करत इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला. 

धावफलक: इंग्लंड : पहिला डाव : सर्वबाद 283 ( कूक 27, हमीद 9, रूट 15, मोईन अली 16, बेअरस्टॉ 89, स्टोक्‍स 29, बटलर 43, वोक्‍स 25, शमी 3-63, उमेश यादव 2-58, जयंत यादव 2-49, आश्‍विन 1-43, जडेजा 2-59)