धोनी व सर्फराजच्या मुलाचा फोटो व्हायरल

वृत्तसंस्था
रविवार, 18 जून 2017

सर्फराजचा मुलगा अब्दुला याला धोनीने कडेवर उचलून घेतले आहे. खेळाला कोणतेही सीमेचे बंधन नाही, अशा प्रतिक्रिया देण्यात येत आहेत.

लंडन - भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी असले तरी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदचा मुलाला उचलून घेत काढलेल्या फोटोमुळे दोन्ही देशांतून सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात येत आहे. धोनीचा हा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील कटूता कमी करण्यासाठी सतत प्रयत्न होत असतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादामुळे दोन्ही संघांमधील द्विपक्षीय क्रिकेट मालिका बंद आहेत. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये हे दोन्ही संघ एकमेकांसमोर येतात. त्यावेळी दोन्ही देशांतील वातावरण वेगळे असले तरी खेळाडू हे खिलाडूवृत्तीने याकडे पाहत असतात. मिस्टर कुल अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीने सर्फराजच्या मुलासह काढलेल्या फोटोमुळे दोन्ही देशांतून सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. ओव्हलच्या मैदानावर आज अंतिम सामना होत असताना हा फोटो व्हायरल होत आहे.

सर्फराजचा मुलगा अब्दुला याला धोनीने कडेवर उचलून घेतले आहे. खेळाला कोणतेही सीमेचे बंधन नाही, अशा प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही विराट कोहलीने दिलेला टी शर्ट ट्विट केला आहे. या टी शर्टवर सर्व भारतीय खेळाडूंच्या सह्या आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
भारतीय संघाला तुम्हीही द्या शुभेच्छा!
जमिनीच्या तुकड्यासाठी शेतकऱ्याचा सायकलवरून 350 किमीचा प्रवास
अविवाहीत मुलीच्या आत्महत्येवरुन चांदुर रेल्वे शहरात तणाव​
कन्नौजमध्ये फटाका कारखान्यात स्फोट; 7 ठार​
कुबट कोपऱ्याचं भान...
दार्जिलिंगचा वणवा (श्रीराम पवार)​
कर्जमाफी, निकष आणि भोग​
#स्पर्धापरीक्षा - फेसबुकचे सोलार ड्रोन​