आयपीएल : पुणे-मुंबई लढणार प्ले-ऑफमध्ये

वृत्तसंस्था
सोमवार, 15 मे 2017

प्ले-ऑफच्या लढती -

  • क्वालिफायर 1 - मुंबई इंडियन्स वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स, 16 मे (मुंबई)
  • एलिमिनेटर लढत - सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकता नाईट रायडर्स, 17 मे (बंगळूर)
  • क्वालिफायर 2 - क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ वि. एलिमिनेटर लढतीतील विजेता संघ, 19 मे (बंगळूर)
  • अंतिम सामना - क्वालिफायर 1 मधील विजेता संघ वि. क्वालिफायर 2 मधील विजेता संघ, 21 मे (हैदराबाद)

मुंबई - आयपीएलच्या दहाव्या मोसमातील प्ले-ऑफच्या लढती निश्चित झाल्या असून, मुंबई इंडियन्स, रायझिंग पुणे सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकता नाईट रायडर्स या संघांनी प्ले-ऑफमध्ये स्थान मिळविले आहे. 

मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स हे संघ पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असल्याने या दोन संघांमध्ये 16 तारखेला वानखेडे स्टेडियमवर अंतिम सामन्यासाठी क्वालिफायर सामना होणार आहे. या दोन्ही संघांमध्ये विजेता संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र होणार आहे. तर, पराभूत संघाला अंतिम फेरीत जाण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. कोलकता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणाऱ्या लढतीतील विजेता संघाशी क्वालिफायर लढतीत पराभूत झालेल्या संघाला खेळावे लागेल. कोलकता आणि हैदराबाद यांच्यातील सामना बंगळूरमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर 19 मे रोजी होणार आहे. या सामन्यात पराभव झालेला संघ आयपीएलबाहेर जाईल.

आयपीएलच्या साखळी फेरीतील सामने संपले असून, मुंबईचा संघाचे 20, पुण्याचे 18, हैदराबादचे 17 आणि कोलकता संघाचे 16 गुण झाले होते. त्यानुसार क्रमवारी ठऱली आहे. आयपीएलचा करंडक कोणता संघ उंचावणार हे 21 मे कळेल.

आयपीएलच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेल्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी यंदाही चांगली झालेली आहे. त्यांनी यापूर्वी 2013 आणि 2015 मध्ये ही स्पर्धा जिंकलेली आहे. तर, दुसरीकडे पुणे संघाला बेन स्टोक्स आणि इम्रान ताहीर यांच्याशिवाय प्ले-ऑफची लढत खेळावी लागणार आहे. स्टोक्सच्या अष्टपैलू कामगिरीची उणीव पुणे संघाला नक्कीच जाणवेल. चँपियन्स करंडकाच्या तयारीसाठी ताहीर आणि स्टोक्स मायदेशी रवाना झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यावर संघाची पूर्ण मदार असणार आहे.

प्ले-ऑफच्या लढती -

  • क्वालिफायर 1 - मुंबई इंडियन्स वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स, 16 मे (मुंबई)
  • एलिमिनेटर लढत - सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकता नाईट रायडर्स, 17 मे (बंगळूर)
  • क्वालिफायर 2 - क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ वि. एलिमिनेटर लढतीतील विजेता संघ, 19 मे (बंगळूर)
  • अंतिम सामना - क्वालिफायर 1 मधील विजेता संघ वि. क्वालिफायर 2 मधील विजेता संघ, 21 मे (हैदराबाद)
Web Title: Mumbai Indians vs Rising Pune Supergiant, SRH vs KKR in IPL 2017 play-offs