सोनपेठमध्ये पावसाला सुरवात वीज पडून दोघे गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 जून 2017

सोनपेठ : सोनपेठ व परीसरात पावसाला सुरुवात झाली असुन विज पडुन खपाट पिंपरी येथील एक महिला व तिचे अपत्य असे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. 

सोनपेठ : सोनपेठ व परीसरात पावसाला सुरुवात झाली असुन विज पडुन खपाट पिंपरी येथील एक महिला व तिचे अपत्य असे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. 

सोनपेठ तालुक्यात मान्सुनचे आगमन झाले असुन ता .११ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पावसाने हजेरी लावली सुमारे अर्धातास चांगला पाऊस झाला .तालुक्यातील खपाटपिंपरी येथे पावसापासुन वाचण्यासाठी शेतात काम करणाऱ्या माय लेकरांनी झाडाखाली आसरा घेतला होता .या पावसात मोबाईल आल्यामुळे मोबाईल खिशातुन.काढत असतांना अचानक मोबाईलवर विज पडुन यात शिवाजी मारुती खंदारे (वय २२, रा. खपाटपिंपरी) हा तरुण गंभीर जखमी झाला. तर त्याची आई कमलबाई मारोती खंदारे वय ६२  यांना ही गंभीर भाजले आहे. त्यांना अधिक उपचारासाठी अंबेजोगाई येथे शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.

मॉन्सूनपूर्व पावसाचे चांगलेच आगमन झाले असले तरी अजून पेरणी योग्य पाऊस झाला नाही. आतापर्यंत दोन ठिकाणी विज पडण्याच्या घटना तालुक्यात घडल्या आहेत एका प्रकरणात दोन बैलांचे बळी गेले आहेत तर आज खपाट पिंपरी येथील मायलेक गंभीर जखमी झाले आहे .शेती कामांना वेग आला असून या वर्षी चांगला पाऊस पडण्याच्या शक्यतेने शेतकरी उत्साहात आहेत. पेरणीच्या कामा साठी बाजारपेठ ही सजली असुन कृषीसेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी दिसु लागली आहे. नागरिक घरांच्या, गोठ्यांच्या दुरुस्त्या करत आहेत.