नव्या खेळाडूंना संधी देण्याची गरज: धोनी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

रांची : 'संघाची मधली फळी अननुभवी आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक संधी देणे गरजेचे आहे,' असे मत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने काल (बुधवार) व्यक्त केले. न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात 261 धावांचा पाठलाग करताना भारताला 19 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. 

संघाला चांगली सुरवात मिळूनही अखेरच्या टप्प्यात भारताचा डाव गडगडला. 'सामना जिंकून देण्याची जबाबदारी कशी उचलायची, हे तरुण खेळाडूंना स्वत:च शिकावे लागेल,' अशी स्पष्टोक्ती धोनीने केली. 

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत धोनी म्हणाला, "क्रिकेट आता बदलले आहे. सर्वच खेळाडूंना उंचावरून फटके मारणे आवडते आणि जमतेही. त्यामुळे 'असे फटके मारू नका' हे त्यांना सांगणे उपयोगाचे नाही. एखाद्याची नैसर्गिक शैली दडपून टाकणे योग्य नाही. मनीष पांडे आणि हार्दिक पंड्या यांनी त्यांच्या पसंतीचे फटके मारण्याचा प्रयत्न केला. या संघात पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणारे खेळाडू नवे आहेत. सामना कसा जिंकून द्यायचा, हे ते अनुभवातून शिकतील. काही जण आक्रमक फटके मारतील, काही जण संयमाने फलंदाजी करतील. आंतरराष्ट्रीय पातळीवर 15-20 सामने खेळल्यानंतर त्यांना याचा अंदाज येईल.'' 

गेल्या एक-दीड वर्षांमध्ये भारतीय संघाने फारसे एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेले नाहीत. या कालावधीत झालेल्या मोजक्‍या सामन्यांमध्ये मी वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. शिवाय, त्यातील काही सामन्यांमध्ये सलामीवीरांनीही भक्कम फलंदाजी केली होती. आता सगळेच वेगळे आहे. 
- महेंद्रसिंह धोनी, भारतीय संघाचा कर्णधार