नवे वर्ष, नवा कर्णधार आणि नवी जर्सी

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, अजिंक्य रहाणे, अश्विन व भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज, हरमनप्रीत कौर या क्रिकेटपटूंचा नवीन जर्सीतील फोटो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मुंबई - भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघासाठी 2017 हे वर्ष अनेकअर्थाने सर्वकाही नवे असणार आहे. भारतीय वनडे संघाचा विराट कोहली हा नवा कर्णधार झाला असून, आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ नव्या जर्सीत दिसणार आहे.

भारतीय संघासाठी नव्याने बनविण्यात नाईके या कंपनीने '4 डी क्युईकनेस' आणि 'झिरो डिस्ट्रॅक्शन्स' यांचा वापर करण्यात आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या आगमी तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ नव्या जर्सीत दिसणार आहे. 

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, अजिंक्य रहाणे, अश्विन व भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज, हरमनप्रीत कौर या क्रिकेटपटूंचा नवीन जर्सीतील फोटो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) प्रसिद्ध करण्यात आला आहे. यापूर्वी 2015 मध्ये भारतीय संघाची जर्सी बदलण्यात आली होती.