स्टॉईनिसच्या जिगरबाज शतकानंतरही ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडविरुद्ध पराभव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

ऑकलंड - मार्क्‌स स्टॉईनिसच्या जिगरबाज नाबाद शतकी खेळीनंतरही ऑस्ट्रेलियाला पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध सहा धावांनी पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडच्या २८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया एकवेळ ६ बाद ६७ असे अडचणीत आले होते; पण त्यानंतर स्टॉईनिस याने एकाहाती ऑस्ट्रेलियाला विजयाजवळ आणले होते; मात्र दुसऱ्या बाजूने त्याला तोडीची साथ मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाचा डाव ४७ षटकांत २८० धावांत संपुष्टात आला. स्टॉईनिसने ११७ चेंडूंत ९ चौकार आणि ११ षटकारांसह नाबाद १४६ धावा केल्या.

ऑकलंड - मार्क्‌स स्टॉईनिसच्या जिगरबाज नाबाद शतकी खेळीनंतरही ऑस्ट्रेलियाला पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध सहा धावांनी पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडच्या २८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया एकवेळ ६ बाद ६७ असे अडचणीत आले होते; पण त्यानंतर स्टॉईनिस याने एकाहाती ऑस्ट्रेलियाला विजयाजवळ आणले होते; मात्र दुसऱ्या बाजूने त्याला तोडीची साथ मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाचा डाव ४७ षटकांत २८० धावांत संपुष्टात आला. स्टॉईनिसने ११७ चेंडूंत ९ चौकार आणि ११ षटकारांसह नाबाद १४६ धावा केल्या. त्यापूर्वी मार्टिन गुप्टिल (६१) आणि नील ब्रूम (७३) यांच्या अर्धशतकी खेळीमुळे न्यूझीलंडला ५० षटकांत २८६ धावा करता आल्या.

संक्षिप्त धावफलक - न्यूझीलंड ५० षटकांत ९ बाद २८६ (मार्टिन गुप्टिल ६१, नील ब्रूम ७३, जेम्स निशाम ४८, मार्कस स्टॉईनिस ३-४९, पॅट कमिन्स २-६७) वि.वि. ऑस्ट्रेलिया ४७ षटकांत सर्वबाद २८० (मार्कस स्टॉईनिस नाबाद १४६ -११७ चेंडू, ९ चौकार, ११ षटकार, पॅट कमिन्स ३६, मिशेल सॅंटनेर ३-४४, लुकी फर्ग्युसन २-४४, ट्रेंट बोल्ट २-५८)

क्रीडा

मुंबई - जागतिक कुस्तीतील निर्णय अधिक अचूक होण्यासाठी मॅटभोवतालच्या कॅमेऱ्यांत वाढ करण्यात आली आहे. पॅरिसला आजपासून सुरू झालेल्या...

09.09 AM

मुंबई - स्वप्नील धोपाडेने एम. आर. ललित बाबूविरुद्धची लढत बरोबरीत सोडवून राष्ट्रीय प्रीमियर बुद्धिबळ स्पर्धेतील प्रवेश निश्‍चित...

09.09 AM

नवी दिल्ली - पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघ आशिया करंडक हॉकी स्पर्धेसाठी पुन्हा एकदा एकाच गटात आले आहेत. भारतात...

09.09 AM