पाकिस्तान 2019 विश्वकरंडकातून आऊट?

पीटीआय
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - इंग्लंड दौऱ्यातील वन-डे मालिका 1-4 अशी गमावल्यानंतर पाकिस्तानला जागतिक क्रमवारीत नीचांकी 86 रेटिंगपर्यंत घसरावे लागले. पाक नवव्या स्थानावर घसरले असून, त्यांच्यावर विश्वकरंडक स्पर्धेतून आऊट होण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानचा संघ एकदिवसीय क्रमवारीत आठव्या क्रमांकावरील विंडीजपेक्षा आठ गुणांनी मागे आहे. यामुळे 2019च्या विश्‍वकरंडक स्पर्धेला थेट पात्र ठरण्याच्या पाकिस्तानच्या आशांना धक्का बसला आहे. स्थान उंचावले नाही, तर त्यांच्यावर पात्रता फेरीत खेळावे लागण्याची नामुष्की येईल. यजमान इंग्लंड आणि क्रमवारीनुसार सात सर्वोत्तम संघ या स्पर्धेला थेट पात्र ठरणार आहेत. 

इतर दोन संघ पात्रता स्पर्धेतून आगेकूच करतील. पात्रता स्पर्धेत दहा संघ असतील. या मालिकेपूर्वी पाकचे 87 रेटिंग होते. विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी 30 सप्टेंबर 2017पर्यंत पाकिस्तानला आपले क्रमवारीतील स्थान सुधारावे लागणार आहे. पाकिस्तान थेट पात्र झाले नाही, तर त्यांना पात्रता फेरीत खेळावे लागणार आहे.

वन-डे क्रमवारी - (कंसात गुणांकन)

1) ऑस्ट्रेलिया (124) 

2) न्यूझीलंड (113) 

3) भारत (110) 

4) दक्षिण आफ्रिका (110) 

5) इंग्लंड (104) 

6) श्रीलंका (101) 

7) बांगलादेश (98) 

8) वेस्ट इंडीज (94) 

9) पाकिस्तान (86) 

10) अफगाणिस्तान (49) 

11) झिंबाब्वे (46) 

12) आयर्लंड (43)