पाकिस्तानने मालिका जिंकली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

त्रिनिदाद - हसन अलीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने तिसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडीजचा 7 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने चार सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना विंडीजचा डाव 8 बाद 124 असा मर्यादित राहिला. चॅडविक वॉल्टन (40) आणि कार्लोस ब्रेथवेट (नाबाद 37) यांच्या खेरीज विंडीजचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. हसनने 12 धावांत दोन गडी बाद केले.

पाकिस्तानने 19 षटकांत 3 बाद 127 धावा केल्या. अहमद शहजाद याने 53; तर बाबर आझमने 38 धावा केल्या. संक्षिप्त धावफलक - वेस्ट इंडीज 20 षटकांत 8 बाद 124 (वॉल्टन 40, ब्रेथवेट नाबाद 37, हसन अली 2-12, शादाब कान 2-16) पराभूत वि. पाकिस्तान 19 षटकांत 3 बाद 127 (अहमद शहजाद 53, बाबर आझम 38, केस्रिक विल्यम्स 2-16)

Web Title: pakistan win t-20 series