सराव, नियोजनापेक्षा चर्चा खेळपट्टीचीच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

नवी दिल्ली - ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील तिसरी कसोटी दोन दिवसांवर आलेली असताना ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमे प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या सराव, नियोजनापेक्षा खेळपट्टीचीच चर्चा रंगवून करत आहेत. पहिल्या दोन कसोटी सामन्यांतील खेळपट्टी लक्षात घेता प्रसारमाध्यमे अशा चर्चेतून यजमानांवर दडपण आणण्याचा वेगळा प्रयत्न या वेळी करत आहेत.

पुण्यातील पहिली कसोटी तीन दिवसांत संपली. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात विजय मिळविला. त्यानंतरही या खेळपट्टीच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले गेले. दुसरी कसोटी भारताने जिंकली. खेळपट्टीला सर्वोत्तम असल्याचे प्रशस्तीपत्र मिळाले. आता तिसरी कसोटी रांचीत होत आहे. सरावादरम्यान खेळपट्टी पाहिल्यावरच ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने भुवया उंचावल्या. ऑस्ट्रेलियन प्रसार माध्यमांनी लगेच संघ व्यवस्थापनाचा हवाला घेत या खेळपट्टीवर खूपच लवकर चेंडू वळतील असा अंदाज व्यक्त केला.

ऑस्ट्रेलियातील "सिडनी मॉर्निंग हेराल्ड' दैनिकाने खेळपट्टीबाबत रकानेच्या रकाने भरून चर्चा सुरू केली आहे. त्यांनीच ही खेळपट्टी पुण्यापेक्षा अधिक लवकर फिरकीच्या आहारी जाणार असे म्हटले आहे. खेळपट्टीवर दिसून येणारे "पॅच' हे आश्‍विनला समोर ठेवूनच ठेवण्यात आल्याचेही या दैनिकाने म्हटले आहे. त्यामुळे या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरणार असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे. सरावा दरम्यान पॅट कमिन्स, जॅक्‍सन बर्ड हे सरावासाठी उपलब्ध खेळपट्टीवरही चेंडूला फारशी उसळी देऊ शकले नाहीत. यावरूनच काय ते समजा असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: practice management discussion