क्रिकेटपटूंच्या मानधनात पाचपट वाढ करण्याचा प्रस्ताव 

पीटीआय
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान कायम राखण्याच्या उंबरठ्यावर असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासक समितीसमोर क्रिकेटपटूंच्या मानधनात पाचपट वाढ करण्याचा प्रस्ताव आला आहे. आयपीएलच्या मोहित करणाऱ्या करारातून मिळणाऱ्या रकमेपेक्षा कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना अधिक रक्कम मिळावी, असा यामागील हेतू असल्याचे मानले जात आहे. 

बीसीसीआयच्या घटना बदलासाठी लोढा समितीसमोर काम करणाऱ्या एका जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार "बीसीसीआय'च्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंना मध्यावर्ती करारानुसार मिळणाऱ्या मानधनात 1 कोटीवरून पाच कोटी वाढ करावी असा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. 

सध्याच्या पद्धतीत अ श्रेणीतील क्रिकेटपटूंना 1 कोटी, तर ब आणि क श्रेणीतील क्रिकेटपटूंना अनुक्रमे 65 आणि 35 लाख रुपये मिळतात. यामधून सामना खेळणाऱ्या अंतिम अकरा खेळाडूंना मिळणारी 15 लाख सामना फी वगळण्यात आली आहे. 

"बीसीसीआय'च्या विशेष सुत्राने दिलेल्या माहितीनुसार आयपीएलचे करार क्रिकेटपटूंना आकर्षित करत असल्याचे दिसून येत आहे. अनेक उदयोन्मुख खेळाडूंना घसघशीत रक्कम मिळाली आहे. मात्र, कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंकडे दुर्लक्ष झाले आहे. कसोटी क्रिकेट हेच खरे क्रिकेट आहे हे निश्‍चित असल्यामुळे या खेळाडूंना अधिक रक्कम मिळावी असे "बीसीसीआय' पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

त्याचबरोबर संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना विविध कंपन्यांनी ब्रॅंड ऍम्बेसिडर म्हणून नियुक्त केले आहे. मात्र, क्रिकेट कारकीर्द मोठी होऊनही काही प्रमुख खेळाडू अजूनही त्यापासून दूर राहिले आहेत. अशा क्रिकेटपटूंनाही हा प्रस्ताव मान्य झाल्यास सहारा मिळेल, अशी देखील चर्चा क्रिकेट वर्तुळात या प्रस्तावानंतर सुरू आहे. 

Web Title: The proposal to increase the players' royalties fivefold