सरावादरम्यान आश्विनच्या हाताला दुखापत

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जुलै 2016

बंगळूर - फिरकीपटू आर. आश्विनच्या हाताला सरावादरम्यान दुखापत झाल्याने भारतीय क्रिकेट संघाला वेस्टइंडीज दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मोठा झटका बसला आहे.

बंगळूर येथे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षण शिबिर सुरु आहे. प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ सराव करत आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर फलंदाजी करताना आश्विनच्या डाव्या हाताला दुखापत झाली. या दुखापतीने स्वरूप किती गंभीर आहे, हे अद्याप समजू शकले नाही. पण आश्विन लवकरच दुखापतीतून सावरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

वेस्टइंडीजच्या दौऱ्यावर भारतीय संघ चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यापूर्वी संघाचे सराव शिबिर आयोजित केले आहे. प्रशिक्षक कुंबळेनी रविवारी संघाच्या सराव शिबिरात विराट कोहली, मुरली विजय, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांना एक तास फलंदाजी करण्यास सांगितले. यावेळी कुंबळेने खेळाडूंना एकदाही बाद न होण्याचे आव्हान दिले होते. पण, अजिंक्य रहाणे वगळता इतर तिन्ही फलंदाज दोनवेळा बाद झाले. भारतीय क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी बंगळूर येथे रविवारी एक बैठक घेण्यात आली. 

टॅग्स