भारताचा विंडीजवर 105 धावांनी विजय

वृत्तसंस्था
सोमवार, 26 जून 2017

संक्षिप्त धावफलक -
भारत 43 षटकांत 5 बाद 310 (अजिंक्‍य रहाणे 103, विराट कोहली 87, शिखर धवन 63) विजयी वि. विंडीज 43 षटकांत 6 बाद 205 (शाय होप 81, भुवनेश्वर कुमार 2-9, कुलदीप यादव 3-50)

पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद) - सलामीचा फलंदाज अजिंक्‍य रहाणेचे दमदार शतक आणि शिखर धवन, विराट कोहली यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विंडीजचा 105 धावांनी सहज पराभव केला. या विजयामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

पावसामुळे उशीरा सुरू झालेल्या सामन्यात भारताने सुरवातीला फलंदाजी करताना 43 षटकांत 5 बाद 310 धावा केल्या. पावसामुळे सामना 43 षटकांचा खेळविण्यात आला. युवराज सिंगला पुन्हा एकदा अपयश आले. रहाणेने 104 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांसह 103 धावा केल्या. तर, धवनने आपला फॉर्म कायम ठेवताना 63 धावा केल्या. कोहलीनेही 66 चेंडूत 87 धावा केल्या. भारताने विंडीजसमोर 43 षटकांत 311 धावांचे आव्हान ठेवले

या आव्हानासमोर विंडीजची सुरवात खराब झआली. भुवनेश्वर कुमारने पॉवेलला पहिल्याच षटकात भोपळाही न फोडता बाद केले. त्यापाठोपाठ मोहम्मदही भुवनेश्वरचा शिकार ठरला. यष्टीरक्षक होपने मधल्या फळीतील फलंदाजांच्या मदतीने संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विंडीजला 43 षटकांत 205 धावांपर्यंतच मजल मारता आली. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने तीन बळी घेतले. 

संक्षिप्त धावफलक -
भारत 43 षटकांत 5 बाद 310 (अजिंक्‍य रहाणे 103, विराट कोहली 87, शिखर धवन 63) विजयी वि. विंडीज 43 षटकांत 6 बाद 205 (शाय होप 81, भुवनेश्वर कुमार 2-9, कुलदीप यादव 3-50)