मुंबई यंदाही अंतिम फेरीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

सतरावर्षीय पृथ्वी शॉचे पदार्पणात शतक; गुजरातविरुद्ध निर्णायक लढत

राजकोट - रणजी क्रिकेटमध्ये पदार्पणातल्या दुसऱ्या डावात शानदार शतकी खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉने मुंबईला पुन्हा एकदा रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत नेले. रणजी स्पर्धेत सर्वांत लहान वयात पदार्पण करताना पृथ्वीने केलेल्या चमकदार खेळीच्या जोरावर मुंबईने तमिळनाडूचे आव्हान सहज पेलले. त्यांनी गुरुवारी तमिळनाडूचा सात गडी राखून पराभव करून ४६ व्यांदा रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

सतरावर्षीय पृथ्वी शॉचे पदार्पणात शतक; गुजरातविरुद्ध निर्णायक लढत

राजकोट - रणजी क्रिकेटमध्ये पदार्पणातल्या दुसऱ्या डावात शानदार शतकी खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉने मुंबईला पुन्हा एकदा रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत नेले. रणजी स्पर्धेत सर्वांत लहान वयात पदार्पण करताना पृथ्वीने केलेल्या चमकदार खेळीच्या जोरावर मुंबईने तमिळनाडूचे आव्हान सहज पेलले. त्यांनी गुरुवारी तमिळनाडूचा सात गडी राखून पराभव करून ४६ व्यांदा रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

यंदाच्या मोसमात वारंवार सलामीवीर बदलणाऱ्या मुंबईने या उपांत्य सामन्यासाठी पृथ्वी शॉला संधी दिली. पहिल्या डावात अवघ्या चार धावांवर खराब फटका मारून बाद झालेल्या शॉने आज दुसऱ्या डावात १२० धावांची शानदार खेळी केली. त्यामुळे मुंबईने विजयाचे २५१ धावांचे आव्हान ६२ षटकांतच तीन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. विजेतेपदासाठी आता मुंबईचा सामना गुजरातविरुद्ध १० ते १४ जानेवारीदरम्यान होणार आहे. ४६ वेळा अंतिम फेरी गाठणाऱ्या मुंबईने यापैकी ४१ वेळा विजेतेपद मिळवले आहे. 

रणजी पदार्पणात याअगोदर सचिन तेंडुलकर, अमोल मुझुमदार, अजिंक्‍य रहाणे, जतीन परांजपे व समीर दिघे या मुंबईकरांनी शतके केलेली आहेत. रणजी पदार्पणात शतक करणारा तो भारतातला १४ वा फलंदाज ठरला आहे. १२० धावांच्या खेळीत एक षटकार व १३ चौकार ठोकणारा पृथ्वी ९९ धावांवर झेलबाद झाला होता; पण विजय शंकरने टाकलेला तो चेंडू नो बॉल ठरला. या जीवदानानंतर एकेरी धाव काढून पृथ्वीने शतक पूर्ण केले.    

अखेरच्या दिवशी आज मुंबईचा विजय त्यानेच सोपा केला. सकाळी दुसरा सलामीवीर प्रफुल्ल वाघेला याच्यासह (३६) पृथ्वीने ९० धावांची सलामी दिली आणि विजयाचा पाया रचला. त्यानंतर श्रेयस अय्यरसह दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी करून मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. श्रेयस ४० धावांवर बाद झाल्यावर पृथ्वीने सूर्यकुमार यादवसह ५७ धावांची भागीदारी केली. पहिल्या डावात अपयशी ठरलेला श्रेयस अय्यरनेदेखील 
अंतिम फेरीच्या पार्श्‍वभूमीवर आपल्याला सूर गवसल्याचे दाखवून दिले.  

संक्षिप्त धावफलक
तमिळनाडू, पहिला डाव ः ३०५ व दुसरा डाव ६ बाद ३५६ घोषित.
मुंबई, पहिला डाव ः ४११ व दुसरा डाव ः ६२.१ षटकांत ४ बाद २५१ (पृथ्वी शॉ नाबाद १२०- १७५ चेंडू, १३ चौकार, १ षटकार, प्रफुल्ल वाघेला ३६, श्रेयस अय्यर ४०, सूर्यकुमार यादव ३४, श्रीनिवास २-७३, विजय शंकर १-३०).

क्रीडा

श्रीपेरंबुदूर - मुंबईच्या सौरव बंदोपाध्याय याने राष्ट्रीय रेसिंग मालिकेतील ॲमीओ करंडक स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतील पहिली शर्यत...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

लखनौ - नऊ सामन्यांत अवघा एकच विजय मिळवल्यामुळे प्रो- कबड्डीच्या पाचव्या मोसमात हेलकावे खात असलेल्या तेलुगू टायटन्सला यू मुम्बाने...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

आव्हान देण्याचीही श्रीलंका संघाची मानसिक तयारी नाही दाम्बुला - कसोटी मालिकेतील धवल यशानंतर श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित...

रविवार, 20 ऑगस्ट 2017