चेपॉकवर अनुपम संकलेचाची कमाल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

चेन्नई - वेगवान गोलंदाज अनुपम संकलेचा याच्या भेदक गोलंदाजीमुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत आसामविरुद्ध डावाने विजय संपादन करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्राला मिळाली आहे. पहिल्या डावात आठ विकेट टिपलेल्या संकलेचाने दुसऱ्या डावात तीन मोहरे गारद केले. त्यामुळे आसामवर फॉलोऑनची नामुष्की ओढविली आहे.

दुसऱ्या डावात आसामची ६ बाद ११५ अशी बिकट स्थिती झाली आहे. डावाची हार टाळण्यासाठी आसामला आणखी १७१ धावांची गरज असून त्यांच्या केवळ चार विकेट बाकी आहेत. महाराष्ट्राच्या ५४२ धावांसमोर आसामची ३ बाद १३२ अशी खराब सुरवात झाली होती. आज त्यांचा पहिला डाव २५६ धावांत संपुष्टात आला.

संकलेचाने दिवसातील पहिल्याच षटकात सैकीयाला यष्टीमागे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर अरुण कार्तिकसह सलामीवीर रिशव दास याने ८५ धावांची भागीदारी रचली. या जोडीने आसामच्या आशा पल्लवित केल्या होत्या. अखेर कर्णधार गुगळेने चिराग खुराणाला पाचारण केले. त्याच्या पहिल्याच षटकात अरुण कार्तिक आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. मिडविकेटला केदार जाधवने त्याचा झेल घेतला. त्याचे अर्धशतक तीनच धावांनी हुकले.

मग पुढच्याच षटकात संकलेचाने रिशवचा अडथळा दूर केला. रिशवच्या ८६ धावा सर्वाधिक ठरल्या. ४ बाद २१९ वरून आसामने अखेरच्या सहा विकेट ३७ धावांत गमावल्या. दासचा त्रिफळा उद्‌ध्वस्त करीत संकलेचानेच आसामचा पहिला डाव संपविला. संकलेचाने ७३ धावांत आठ विकेट घेतल्या. चिरागने ३४ धावांत दोन विकेट घेतल्या.

दुसऱ्या डावात मग संकलेचानेच पहिले यश मिळवून दिले. डावाच्या तिसऱ्याच षटकात त्याने स्वतःच्याच गोलंदाजीवर हजारिकाचा झेल टिपला. आसामची मदार रिशव याच्यावरच होती, पण मोहसीन सय्यदने त्याला चकविले. रिशवचा झेल यष्टिरक्षक विशांत मोरेने टिपला. मोहसीनने पुढच्याच षटकात वर्माला भोपळा फोडू दिला नाही. जम बसण्याच्या मार्गावर असलेल्या रॉयला चिरागने माघारी धाडले. 

धावफलक
महाराष्ट्र ः पहिला डाव ः ५४२
आसाम ः पहिला डाव ः रिशव दास झे. बावणे गो. संकलेचा ८६-२०१ चेंडू, ११ चौकार, राहुल हजारिका झे. नौशाद गो. संकलेचा ५, शिवशंकर रॉय त्रि. गो. संकलेचा ०, अमित वर्मा झे. मोरे गो. संकलेचा २७, कुणाल सैकिया झे. मोरे गो. संकलेचा ३९, के. बी. अरुण कार्तिक झे. जाधव गो. खुराणा ४७, जेय सय्यद महंमद झे. मोरे गो. संकलेचा १५, स्वरूपम पुरुकायस्थ पायचीत गो. संकलेचा ५, अबू नेचीम झे. मोहसीन गो. खुराणा ६, अरुप दास त्रि. गो. संकलेचा ७, मृण्मय दत्ता नाबाद ४, अवांतर १५, एकूण ७७ षटकांत सर्वबाद २५६

बाद क्रम ः १-१३, २-१३, ३-५६, ४-१३४, ५-२१९, ६-२१९, ७-२३९, ८-२४०, ९-२५२.

गोलंदाजी ः अनुपम संकलेचा २२-६-७३-८, मोहसीन सय्यद ११-३-३४-०, अक्षय दरेकर १४-१-५१-०, सत्यजित बच्छाव २१-५-५१-०, चिराग खुराणा ९-२-३४-२.

आसाम ः दुसरा डाव ः रिशव झे. मोरे गो. सय्यद १४, हजारिका झे. व गो. संकलेचा १, रॉय झे. बावणे गो. खुराणा २५, वर्मा झे. बदली खेळाडू (राहुल त्रिपाठी) गो. सय्यद ०, सैकिया झे. मोरे गो. संकलेचा ३३, अरुण कार्तिक खेळत आहे ३३, महंमद झे. व गो. संकलेचा १, पुरुकायस्थ खेळत आहे ७, अवांतर १, एकूण ४६ षटकांत ६ बाद ११५

बाद क्रम ः १-४, २-२८, ३-३२, ४-५१, ५-१०३, ६-१०७

गोलंदाजी ः संकलेचा १०-३-३७-३, मोहसीन १०-४-२१-२, बच्छाव ८-१-२३-०, खुराणा १४-१-२९-१, दरेकर ४-२-५-०

Web Title: Ranji Trophy