गतविजेत्या हैदराबादकडून गुजरात लायन्सचा धुव्वा

वृत्तसंस्था
रविवार, 9 एप्रिल 2017

संक्षिप्त धावफलक -
गुजरात 20 षटकांत 7 बाद 135 (ड्‌वेन स्मिथ 37, दिनेश कार्तिक 30, जेसन रॉय 31, रशिद खान 3-19, भुवनेश्‍वर कुमार 2-21) पराभूत वि. हैदराबाद 15.3 षटकांत 1 बाद 140 (डेव्हिड वॉर्नर नाबाद 76-45 चेंडू, 6 चौकार, 4 षटकार, मोझेस हेन्‍रिकेज नाबाद 52)

हैदराबाद - गतविजेत्या सनरायझर्स हैदराबाद संघाने दहाव्या आयपीएलमधील आपला धडाका कायम राखला. घरच्या मैदानावर रविवारी झालेल्या सामन्यात एकट्या डेव्हिड वॉर्नरने गुजरात लायन्सची शिकार केली.

प्रथम फलंदाजी करताना गुजरातला 20 षटकांत 7 बाद 135 धावांचीच मजल मारता आली. अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाज रशिद खान याने तीन गडी बाद केले. त्यानंतर हैदराबादने 15.3 षटकांतच 1 बाद 140 धावा केल्या. गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या कर्णधार वॉर्नरने 45 चेंडूंत 6 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 76 धावांची खेळी केली. त्याला हेन्‍रिकेझ याने (नाबाद 52) सुरेख साथ दिली. या जोडीने 108 धावांची नाबाद भागीदारी केली.

गुजरातच्या फलंदाजांना फटकेबाजी करण्यात आलेले अपयश आणि हैदराबादच्या रशिदच्या फिरकीचे यश हेच त्यांच्या विजयात निर्णायक ठरले. गुजरातला आयपीएलमध्ये अजून हैदराबादविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही.