रोहितऐवजी पुजाराला संधी द्या - लक्ष्मण

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात मधल्या फळीत बेभरवशी रोहित शर्माच्या जागी चेतेश्वर पुजाराला स्थान देण्यात यावे, असे मत माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने व्यक्त केले आहे.

 

नवी दिल्ली - न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात मधल्या फळीत बेभरवशी रोहित शर्माच्या जागी चेतेश्वर पुजाराला स्थान देण्यात यावे, असे मत माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने व्यक्त केले आहे.

 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला 22 सप्टेंबरपासून सुरवात होत आहे. कानपूर येथे पहिली कसोटी खेळविली जाणार आहे. पंधरा सदस्यांच्या संघात रोहित शर्मा व चेतेश्वर पुजाराची निवड करण्यात आली आहे. मात्र, अंतिम अकरा संघात या दोघांपैकी एकाला स्थान मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्माची कामगिरी खराब झालेली आहे. तर, दिलीप करंडक स्पर्धेत पुजाराने चांगली कामगिरी केलेली आहे. मायदेशात पुजारा कायम यशस्वी ठरला आहे.

 

लक्ष्मण म्हणाला, ‘‘मला निवड करण्यास सांगितले, तर मी पुजाराची निवड करेल. दुलिप करंडकात त्याने तीन डावांमध्ये 226.5 च्या सरासरीने 453 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजासाठी तो योग्य आहे. भारताने पहिल्या कसोटीत पाच गोलंदाजांसह उतरले पाहिजे. मुरली विजय आणि के. एल. राहुल ही सलामीची जोडी असली पाहिजे. रोहितने आपल्या गेमप्लॅनमध्ये बदल केला तर तो कसोटी विजेता खेळाडू होऊ शकतो. कर्णधार कोहली वातावरण पाहून संघ निवडण्यात यशस्वी ठरला आहे.‘‘