पुण्याला विजयाचा मार्ग गवसला 

वृत्तसंस्था
सोमवार, 17 एप्रिल 2017

पुण्याच्या गोलंदाजांनी राखलेल्या अचूक टप्प्यावर बंगळूरच्या फलंदाजांना खेळता आले नाही. त्यांचा डाव 9 बाद 133 धावांवर मर्यादित राहिला. 

बंगळूर : घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यानंतर सलग तीन पराभवांचा सामना करणाऱ्या रायझिंग पुणे सुपर जायंट्‌स संघाला रविवारी पुन्हा विजयाचा मार्ग दिसला.

त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाला त्यांच्या मैदानावर 27 धावांनी हरवले. 
प्रथम फलंदाजी करताना पुणे संघाने 20 षटकांत 8 बाद 161 धावा केल्या. त्यानंतर कोहली, एबी डिव्हिलर्स यांच्या आक्रमकतेने आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या बंगळूरचा डाव गडगडला.

पुण्याच्या गोलंदाजांनी राखलेल्या अचूक टप्प्यावर बंगळूरच्या फलंदाजांना खेळता आले नाही. त्यांचा डाव 9 बाद 133 धावांवर मर्यादित राहिला. 

प्रथम फलंदाजी करताना पुणे संघाला अजिंक्‍य रहाणे आणि राहुल त्रिपाठी यांच्याकडून चांगली सुरवात मिळाली. त्यानंतर स्मिथ आणि धोनी देखील लय राखून खेळत होते. मात्र, दोन चेंडूंच्या अंतराने ही जोडी बाद झाली आणि पुण्याचा डाव गडगडला. मनोज तिवारीने अखेरच्या दोन षटकांत फटकेबाजी केल्याने त्यांचे आव्हान उभे राहिले. 

संक्षिप्त धावफलक 
रायझिंग पुणे सुपर जायंट्‌स 20 षटकांत 8 बाद 161
(मनोज तिवारी नाबाद 27 - 11 चेंडू, 3 चौकार, 2 षटकार, अजिंक्‍य रहाणे 30, राहुल त्रिपाठी 31, स्टिव्ह स्मिथ 27, महेंद्रसिंह धोनी 28, ऍडम मिल्ने 2-27, एस. अरविंद 2-29)

वि.वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर 20 षटकांत 9 बाद 134 (विराट कोहली 28, एबी डिव्हिलर्स 29, शादुर्ल ठाकूर 3-35, जयदेव उनाडकट 2-25, बेन स्टोक्‍स 3-18)