भारताचा धावांचा डोंगर; रोहित, जडेजाची अर्धशतके

वृत्तसंस्था
रविवार, 25 सप्टेंबर 2016

कानपूर : अनेक दिवसांनी सूर गवसलेला रोहित शर्मा, संयमी अजिंक्‍य रहाणे आणि ‘स्टायलिश‘ रवींद्र जडेजा यांच्या भक्कम योगदानामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यावर भारताने पूर्णपणे पकड मिळविली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने पाच बाद 377 या धावसंख्येवर दुसरा डाव घोषित केला. यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 434 धावांचे अशक्‍यप्राय आव्हान मिळाले आहे. ही खेळपट्टी फिरकीला साथ देत असून न्यूझीलंडसमोर पुढील किमान चार सत्रे फिरकी गोलंदाजांना तोंड देण्याचे खडतर आव्हान आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडचे नऊ फलंदाज फिरकी गोलंदाजीवरच बाद झाले होते. 

काल खेळ थांबला, तेव्हा नाबाद असलेल्या मुरली विजय आणि चेतेश्‍वर पुजारा यांनी त्याच धडाक्‍याने आजही फलंदाजी केली. विजय 76 धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो केवळ 18 धावाच करू शकला. विजयनंतर कोहली आणि पुजाराही फार धावा न करता बाद झाले. रहाणे आणि रोहित शर्मा या मुंबईकरांनी भारताची धावसंख्या 277 पर्यंत नेली. त्यानंतर जडेजा आणि रोहित यांनी 100 धावांची नाबाद भागीदारी करत न्यूझीलंडसमोरील आव्हान अधिक खडतर केले. जडेजाचे अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर कर्णधार कोहलीने डाव घोषित केला. कसोटीमधील पाचवे अर्धशतक झळकावताना रोहित शर्माने 1,000 धावांचा टप्पाही ओलांडला. 

संक्षिप्त धावफलक : 
भारत : पहिला डाव : सर्वबाद 318 
न्यूझीलंड : पहिला डाव : सर्वबाद 262 
भारत : दुसरा डाव : 5 बाद 377 घोषित 

के. एल. राहुल 38 
मुरली विजय 76 
चेतेश्‍वर पुजारा 78 
विराट कोहली 18 
अजिंक्‍य रहाणे 40 
रोहित शर्मा नाबाद 68 
रवींद्र जडेजा नाबाद 50 
अवांतर : 9 
गोलंदाजी : 

ट्रेंट बोल्ट 0-34 
मिशेल सॅंटनर 2-79 
मार्क क्रेग 1-80 
नील वॅग्नर 0-52 
ईश सोधी 2-99 
मार्टिन गुप्टील 0-17 
केन विल्यमसन 0-7