बंगळूरचा दुसरा विजय 

पीटीआय
बुधवार, 19 एप्रिल 2017

राजकोट - ख्रिस गेल नावाचे तुफान धडकल्यावर रॉयल चॅलेंजर्स संघाला यंदाच्या आयपीएल मोसमात सहाव्या सामन्यानंतर दुसऱ्या विजयाची नोंद करणे शक्‍य झाले. बंगळूरने मंगळवारी झालेल्या सामन्यात गुजरात लायन्सचा 21 धावांनी पराभव केला. 

बंगळूरने प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 213 धावांची मोठी मजल मारली. त्यानंतर ब्रेंडन मॅकलमचा झंझावत थंडावल्यावर गुजरातचा डाव 7 बाद 192 असा मर्यादित राहिला. 

प्रथम फलंदाजी करताना ख्रिस गेल आणि कर्णधार विराट कोहलीच्या झंझावाताने बंगळूरच्या डावाचा पाया भक्कम झाला. गेलची तुफानी फटकेबाजी आणि कोहलीची संयमी साथ यामुळे बंगळूरचे आव्हान उभे राहिले. दोघे बाद झाल्यावर ट्राव्हिस हेड आणि केदार जाधव यांनी देखील धावांचा वेग कायम राखल्याने बंगळूरचे आव्हान अधिक भक्कम झाले. आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातसाठी मॅकलमने आकर्षक फटकेबाजी केली. मात्र, त्याला समोरून साथ मिळाली नाही. इशान किशनने शेवटी 16 चेंडूंत 39 धावांचा तडाखा दिला. पण, तोवर सामना त्यांच्या हातून निसटला होता. 

संक्षिप्त धावफलक 
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर 20 षटकांत 2 बाद 213 (ख्रिस गेल 77 -38 चेंडू, 5 चौकार, 7 षटकार, विराट कोहली 64 -50 चेंडू, 7 चौकार, 1 षटकार, ट्राव्हिस हेड नाबाद 30, केदार जाधव नाबाद 38) वि.वि. गुजरात 7 बाद 193 (ब्रेंडन मॅकलम 72 -44 चेंडू, 2 चौकार, 7 षटकार, सुरेश रैना 23, युजवेंद्र चहल 3-31)