ड्रेसिंग रूमची मदत आता विराटने घ्यावी - गावसकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही म्हणून भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी "आयसीसी'वर टीका केली आहे. आता रांचीतील कसोटीच्या वेळी "डीआरएस'चे अपील करण्यासाठी विराट कोहली याला ड्रेसिंग-रूमची मदत घेताना पाहून आपल्याला आनंद वाटेल, असे त्यांनी उपहासाने सांगितले.

ते म्हणाले की, "काही देशांना अनुकूल वर्तणूक दिली जाते, तर काही देशांना प्रतिकूल पद्धतीने वागविले जाते. हेच जर भारतीय खेळाडूने केले तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. आता विराटने ड्रेसिंग रूमकडे पाहून त्यांची प्रतिक्रिया आजमावून पाहावी. "डीआरएस' अपील करण्याविषयी त्याला होकार किंवा नकार मिळेल का याची मला कल्पना नाही, पण तसे झालेले मला आवडेल. कारण, त्यामुळे सामनाधिकारी आणि आयसीसी काय करतात, हे आपल्याला पाहता येईल. स्मिथने जे काही केले, त्यात सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांना काहीच चूक वाटले नाही. तेथेच हे प्रकरण संपले. यातून आयसीसी आचारसंहितेचा भंग झाला असे त्यांना वाटले नाही. मी रागाच्या भरात काहीही बोलू शकतो, पण सामनाधिकाऱ्यांना यात काहीच चूक वाटत नाही. किमान "आयसीसी'च्या निवेदनावरून तरी तसे सूचित होते. हे चुकीचे आहे, असे तुम्ही म्हणू शकता. प्रत्यक्षात यातून "बीसीसीआय', विराट आणि भारतीय संघाचा अनादर झाला आहे.'