आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आफ्रिदीचा अलविदा

पीटीआय
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

शारजा - पाकिस्तानचा अष्टपैलू शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आपल्या तडाखेबंद फलंदाजीने क्रिकेटविश्‍वात आफ्रिदीने २१ वर्षे छाप पाडली होती.
कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून अगोदरच निवृत्त झालेल्या आफ्रिदीने गेल्या वर्षी भारतात झालेल्या ट्‌वेन्टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानचे नेतृत्व केले होते.

पाकिस्तान संघाच्या अपयशी कामगिरीवरून आफ्रिदीला जबाबदार धरण्यात आले होते, त्याचवेळी त्याच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. कर्णधारपदाचा राजीनामा देऊन त्याने खेळत राहण्याची इच्छा जाहीर केली होती. 

श्रीलंकेविरुद्ध १९९६ मध्ये एकदिवसीय सामन्यात ३७ चेंडूंत शतक करण्याचा त्याचा विक्रम १७ वर्षे कायम राहिला होता. आक्रमक फलंदाजीबरोबर गोलंदाज म्हणूनही सामने जिंकून देण्याची क्षमता त्याच्यामध्ये होती. २००९ मध्ये पाकिस्तानने मिळवलेल्या ट्‌वेन्टी-२० विश्‍वविजेतेपदामध्ये त्याची कामगिरी निर्णायक ठरली होती.

दृष्टिक्षेपात कामगिरी
कसोटी ः सामने  २७, धावा १७१६, सर्वोच्च १५६, सरासरी ३६.५१, शतके ५, अर्धशतक ८, विकेट ४८

वन-डे ः सामने ३९८, धावा ८०६४, सर्वोच्च १२४,
स्ट्राइक रेट ११७.००, विकेट ३९५, 
इकॉनॉमी रेट ३४.५१

टी-२० ः सामने ९८, धावा १४०५, सर्वोच्च नाबाद ५४
अर्धशतके ४, विकेट ९७, इकॉनॉमी रेट ६.६१

Web Title: Shahid Afridi announces retirement from international cricket