धवनचे शतक आणि धवलची हॅटट्रिक 

वृत्तसंस्था
शनिवार, 25 मार्च 2017

विशाखापट्टणम : शिखर धवनचे शानदार शतक आणि धवल कुलकर्णीची हॅटट्रिक यामुळे 'इंडिया रेड' संघाने देवधर करंडक स्पर्धेत 'इंडिया ब्ल्यू' संघाचा 23 धावांनी पराभव केला.

इंडिया रेड संघाने प्रथम फलंदाजी करताना 327 धावा केल्या. या आव्हानासमोर इंडिया ब्ल्यू संघाने अंबाती रायडूच्या तडफदार 92 धावांच्या जोरावर पाठलाग कायम ठेवला होता, परंतु अखेरच्या काही षटकांत मुंबईकर धवल कुलकर्णीने सलग तीन चेंडूंवर तीन बळी मिळवून हॅट्ट्रिक केली; त्यामुळे त्यांचा डाव 304 धावांवर संपुष्टात आला. 

धवलने आपल्या आठव्या आणि डावाच्या 47 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शार्दुल ठाकूरला बाद केले. त्यानंतर आपल्या पुढच्या षटकात पहिल्या दोन चेंडूंवर दीपक हुडा आणि सिद्धार्थ कौल यांना बाद केले. त्याअगोदर रायडूने एकहाती किल्ला लढवला होता. मनोज तिवारी, रिषभ पंत आणि दीपक हुडा यांनी त्याला बऱ्यापैकी साथ दिली, परंतु या तिघांना मोठी खेळी करता आली नाही. 

तत्पूर्वी टीम इंडियाच्या एकदिवसीय संघात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शिखर धवनने 122 चेंडूंत 128 धावांची खेळी केली. त्याने इंडिया रेडचा कर्णधार पार्थिव पटेलसह 93 धावांची भागीदारी करून भक्कम पायाभरणी केली. त्यामुळे इशांत जग्गीने अर्धशतकी खेळी केल्यामुळे रेड संघाला त्रिशतकी मजल नक्की करता आली. 

संक्षिप्त धावफलक 
इंडिया रेड : 50 षटकांत 8 बाद 327
(पार्थिव पटेल 50- 48 चेंडू, 9 चौकार, शिखर धवन 128- 122 चेंडू, 13 चौकार, 3 षटकार, इशांत जग्गी 53- 51 चेंडू, 6 चौकार, 1 षटकार, सिद्धार्थ कौल 10-0-59-5, कुणाल पंड्या 8-0-41-2).

वि. वि. इंडिया ब्ल्यू : 48.2 षटकांत सर्व बाद 304 (अंबाती रायडू 92- 92 चेंडू, 8 चौकार, 2 षटकार, मनोज तिवारी 37, कुणाल पंड्या 31, दीपक हुडा 46- 27 चेंडू, 2 चौकार, 3 षटकार, धवल कलकर्णी 9.2-1-64-3, अक्षय कर्नवार 9-0-60-3).

Web Title: Shikhar Dhawan hits a ton; Dhaval Kulkarni takes hattrick against India Blue