शिखर धवन जायबंदी

पीटीआय
शनिवार, 21 जानेवारी 2017

कोलकता - भारताचा सलामीवीर शिखर धवन जायबंदी झाला आहे. त्याच्या डाव्या हाताचा अंगठा दुखावला आहे. त्यामुळे रविवारी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या अखेरच्या तिसऱ्या सामन्यातील त्याचा सहभाग अनिश्‍चित बनला आहे. मुळात धवनने फॉर्म गमावला आहे. त्यातच अजिंक्‍य रहाणेसारखा खेळाडू संघात येऊ शकत नसल्यामुळे धवनचे स्थान धोक्‍यात आले आहे. दोन सामन्यांत तो केवळ १ व ११ धावा करू शकला. संघ कोलकत्यात दाखल होताच धवन तपासणीसाठी रुग्णालयात गेला. न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीनंतर त्याच्या अंगठ्याचे हाड किरकोळ फ्रॅक्‍चर झाले होते.