शुभांगी कुलकर्णीला एमसीसीचे सदस्यत्व

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

पुणे - भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार पुण्याची शुभांगी कुलकर्णी हिला मेरिलीबोन क्रिकेट क्‍लबने (एमसीसी) मानस सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. भारताच्या एकूण नऊ महिला क्रिकेटपटूंचा सदस्यत्व देऊन सन्मान करण्यात आला आहे.

माजी कसोटीपटू चंदू बोर्डे यांच्यानंतर "एमसीसी'चे सदस्यत्व मिळणारी शुभांगी पुण्यातील पहिली महिला आणि दुसरी क्रिकेटपटू ठरली आहे.
या संदर्भात "सकाळ'शी बोलताना शुभांगी म्हणाली, ""मेरिलीबोन क्‍लबचे सदस्यत्व हा मला मिळालेला आश्‍चर्याचा धक्का होता. या सन्मानाने मी भारावून गेले आहे. लॉर्डसवर मी पहिल्यांदा खेळले तो दिवस माझ्या डोळ्यासमोर आला. लॉर्डस या क्रिकेटपंढरीच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळावी, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्याच क्‍लबची आता सदस्य झाले हा मी मोठा सन्मान मानते.''

एक काळ असा होता की लॉर्डसवर केवळ इंग्लंडच्या राणीखेरीज एकाही महिलेला प्रवेश नव्हता. त्याच क्‍लबने आता नऊ भारतीय महिलांना सदस्यत्व बहाल केले आहे. शुभांगीबरोबर शांतारंगा स्वामी, सुधा शहा, डायना एडलजी, संध्या अगरवाल, गार्गी बॅनर्जी, अमित शर्मा आणि शशी गुप्ता या अन्य महिला क्रिकेटपटूंनाही "एमसीसी'ने सदस्यत्व दिले आहे.