किवींची आश्‍वासक सुरवात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

ड्युनेडीन - दक्षिण आफ्रिकेला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात 308 धावांत रोखल्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसअखेर 3 बाद 177 अशी आश्‍वासक सुरवात केली. कर्णधार केन विल्यम्सन 78 धावांवर नाबाद आहे. रॉस टेलरला दुखापतीमुळे आठ धावांवर "जखमी निवृत्त' व्हावे लागले. 4 बाद 229 वरून आफ्रिकेला आणखी 79 धावांचीच भर घालता आली. सलामीवीर डीन एल्गर 128 धावांवर नाबाद होता. तो आणखी केवळ 12 धावा करू शकला. ट्रेंट बोल्टने चार विकेट घेतल्या.

संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका - पहिला डाव - 122.4 षटकांत सर्वबाद 308 (डीन एल्गर 140, फाफ डू प्लेसिस 52, तेंबा बावुमा 64, ट्रेंट बोल्ट 4-64, नील वॅग्नर 3-88, जीतन पटेल 2-85)
न्यूझीलंड - पहिला डाव - 55 षटकांत 3 बाद 177 (टॉम लॅथम 10, जीत रावळ 52, केन विल्यम्सन खेळत आहे 78, केशव महाराज 2-57)