ताहिर, आमलाच्या खेळीने दक्षिण आफ्रिकेचा विजय 

वृत्तसंस्था
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

ऑकलंड : सलामीचा फलंदाज हाशिम आमला आणि गोलंदाज इम्रान ताहिरच्या फिरकीने दक्षिण आफ्रिकेने शुक्रवारी न्यूझीलंड दौऱ्याची विजयी सुरवात केली. पहिल्या टी-20 सामन्यात त्यांनी न्यूझीलंडचा 78 धावांनी पराभव केला. 

ऑकलंड : सलामीचा फलंदाज हाशिम आमला आणि गोलंदाज इम्रान ताहिरच्या फिरकीने दक्षिण आफ्रिकेने शुक्रवारी न्यूझीलंड दौऱ्याची विजयी सुरवात केली. पहिल्या टी-20 सामन्यात त्यांनी न्यूझीलंडचा 78 धावांनी पराभव केला. 

प्रथम फलंदाजी करताना हाशिम आमलाच्या 62 धावांच्या सुरेख खेळीने दक्षिण आफ्रिकेचे 6 बाद 185 धावांचे आव्हान उभे राहिले. आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने तिसऱ्याच षटकांत लागोपाठच्या चेंडूंवर दोन फलंदाज गमावले. या धक्‍क्‍यातून त्यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. ताहिरच्या फिरकीसमोर त्यांच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. टॉम ब्रूस (33) आणि शेवटी टीम साऊदी (20) यांच्या फलंदाजीने त्यांनी डावांत शतक झळकाविल्याचे समाधान लाभले. दक्षिण आफ्रिकेच्या ताहिरने 24 धावांत पाच गडी बाद केले. 

दक्षिण आफ्रिकेच्या डावात डी कॉकला भोपाळाही फोडता आला नाही. अर्थात, त्याची कसर आमलाने भरून काढली. त्याने 43 चेंडूंत 62 धावांची खेळी केली. डू प्लेसिसच्या साथीत त्याने दुसऱ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. त्यानंतर डीव्हिलर्स आणि जेपी ड्युमिनी यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीतील फलंदाजीने दक्षिण आफ्रिकेचे आव्हान भक्कम राहिले. 

संक्षिप्त धावफलक : 
दक्षिण आफ्रिका 20 षटकांत 6 बाद 185 (हाशिम आमला 62, डू प्लेसिस 36, जेपी ड्युमिनी 29, डिव्हिलर्स 26, ट्रेंट बोल्ट 2-8, ग्रॅंडहोम 2-22) वि.वि. न्यूझीलंड 14.5 षटकांत सर्वबाद 107 (टॉम ब्रूस 33, टीम साऊदी 20, इम्रान ताहिर 5-24, फेहलुवायो 3-19, ख्रिस मॉरिस 2-10). 

क्रीडा

मुंबई - जागतिक कुस्तीतील निर्णय अधिक अचूक होण्यासाठी मॅटभोवतालच्या कॅमेऱ्यांत वाढ करण्यात आली आहे. पॅरिसला आजपासून सुरू झालेल्या...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

मुंबई - स्वप्नील धोपाडेने एम. आर. ललित बाबूविरुद्धची लढत बरोबरीत सोडवून राष्ट्रीय प्रीमियर बुद्धिबळ स्पर्धेतील प्रवेश निश्‍चित...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली - पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघ आशिया करंडक हॉकी स्पर्धेसाठी पुन्हा एकदा एकाच गटात आले आहेत. भारतात...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017