उथप्पाची कर्नाटकला सोडचिठ्ठी; नव्या मोसमात केरळचे प्रतिनिधित्व

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

बंगळूर - सब-ज्युनिअर, ज्युनिअर आणि सीनिअर अशा तिन्ही गटांत कर्नाटकाचे प्रतिनिधित्व करून सलामीचा फलंदाज, यष्टिरक्षक, कर्णधार अशा जबाबदारी समर्थपणे हाताळणाऱ्या रॉबिन उथप्पाने यंदाच्या मोसमापासून त्याच कर्नाटक संघाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. 

उथप्पा नव्या मोसमापासून केरळ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. कर्नाटकडून गेली १५ वर्षे खेळल्यानंतर ३१ वर्षीय उथप्पाने हा निर्णय घेतला. कर्नाटक संघटनेने देखील त्याला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. संघ सोडण्यास उथप्पाने त्याची कारणे दिली आहेत. आम्ही त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण, आम्हाला यश आले नाही, असे कर्नाटक क्रिकेट संघटनेचे सचिव सुधाकर राव यांनी सांगितले. कर्नाटकाकडून उथप्पा १०१ प्रथम श्रेणी सामने खेळला असून, १८ शतके, ३३ अर्धशतकांसह त्याने ६,८६५ धावा केल्या आहेत. यष्टिरक्षक आणि मैदानवरील क्षेत्ररक्षक म्हणून त्याने एकूण १०२ झेल घेतले आहेत. 

गेल्या मोसमातील अपयशानंतर त्याला टी २० स्पर्धेसाठी देखील कर्नाटक संघातून वगळण्यात आले होते. त्याच्या सोडचिठ्ठीमागे हेच कारण असल्याचे बोलले जात आहे.