भारताला विजेतेपदाची संधी - ब्रेट ली

पीटीआय
शुक्रवार, 9 जून 2017

मुंबई - समतोलपणामुळे भारताला यंदाही चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याची संधी आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने व्यक्त केले. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आता रंग भरले आहेत.

भारतीय संघ दिमाखदार कामगिरी करत आहे. माझा पाठिंबा अर्थातच ऑस्ट्रेलियाला असला तरी चॅंपियन्स करंडक पुन्हा जिंकण्याची भारताला अधिक संधी आहे, असे ब्रेट लीने सांगितले. गेल्या रविवारी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू मॅचविनर आहे; तसेच संघाचा समतोलही भारी आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत ते श्रेष्ठ आहेत. त्यामुळे या स्पर्धेत ते मोठी मजल मारू शकतात, असाही विश्‍वास ब्रेट लीने व्यक्त केला. कर्करोगग्रस्त मुलांसाठी म्युझिकल थेरपीच्या कार्यक्रमासाठी ब्रेट ली मुंबईत आलेला आहे.