बांगलादेशला कमी लेखत नाही - कोहली 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

बर्मिंगहॅम - बांगलादेश संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवलेली सुधारणा लक्षात घेता, भारताचा कर्णधार विराट कोहलीदेखील त्यांनी कमी लेखण्याची चूक करण्यास तयार नाही. तो म्हणाला, ‘‘बांगलादेश संघात गुणात्मक सुधारणा खूप झाली आहे. ते चांगल्या संघांना सतत आव्हान देत आहेत. भारतीय संघ त्यांच्या क्षमतेला जाणतो, त्यामुळे त्यांना कमी लेखण्याचा प्रश्‍नच नाही.’’

भारतीय संघाच्या तयारीविषयीदेखील कोहलीने समाधान व्यक्त केले. तो म्हणाला, ‘‘बांगलादेश संघ आता बेधडक खेळू लागला आहे. अनेकदा ते प्रतस्पिर्धी संघासमोर प्रश्‍नचिन्ह उभे करतात. त्याचा अभ्यास करूनच आम्ही तयारी जोरदार केली आहे. गेल्या सामन्यात काय झाले, याकडे लक्ष न देता उद्या आपल्याला काय करायचे, याचा विचार आम्ही केला आहे. फलंदाजांचा फॉर्म भन्नाट आहे. गोलंदाजही उत्तम कामगिरी करत आहे. महत्त्वाचे म्हणजे क्षेत्ररक्षणाच्या आघाडीवरदेखील सुधारणा झाली आहे. त्यामुळे परिपूर्ण क्रिकेट खेळून पुढे जायचेच, हेच आमचे उद्दिष्ट आहे.’’ 

भारतीय संघाची ताकद ही आम्ही मिळवलेल्या यशात दडलेली आहे, असे सांगून विराटने या कामगिरीत सातत्य राखल्याचे समाधान व्यक्त केले.