सामना न झाल्यास भारत अंतिम फेरीत

पीटीआय
गुरुवार, 15 जून 2017

बर्मिंगहॅम - भारत आणि बांगलादेश यांच्यातील उपांत्य लढतीत पावसामुळे खेळ होण्याची शक्‍यता दिसत नाही. मात्र, ही लढत न झाल्यास साखळीत जास्त लढती जिंकल्यामुळे भारत अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. 

बर्मिंगहॅम - भारत आणि बांगलादेश यांच्यातील उपांत्य लढतीत पावसामुळे खेळ होण्याची शक्‍यता दिसत नाही. मात्र, ही लढत न झाल्यास साखळीत जास्त लढती जिंकल्यामुळे भारत अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. 

बर्मिंगहॅमचे हवामान खेळासाठी पोषक आहे. येथील हवामान खात्याच्या अंदाजानुसार सकाळी ढगाळ हवामान असेल, तर दुपारी हलक्‍या सरी होतील आणि त्यानंतर स्वच्छ सूर्यप्रकाश असेल. त्यामुळे खेळात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्‍यता कमी आहे. उपांत्य लढतीसाठी राखीव दिवस नसला तरी अंतिम सामन्यासाठी सोमवारचा दिवस राखीव आहे. स्पर्धेच्या नियमानुसार उपांत्य फेरीच्या लढतीत प्रत्येकी २० षटकांचा खेळही न झाल्यास साखळीत जास्त लढती जिंकलेला संघ विजयी घोषित करण्यात येईल. भारताने साखळीत दोन लढती जिंकल्या आहेत; तर बांगलादेशने केवळ एक. त्यामुळे भारत अंतिम फेरीत प्रवेश करेल. याचबरोबर निव्वळ धावगतीतही भारत (+१.३७०) बांगलादेशच्या (०.०००) पुढे आहे.