दडपण झुगारून खेळायचे - मोर्तझा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

बर्मिंगहॅम - बांगलादेशाचा कर्णधार मश्रफी मोर्तझा याने सामना आव्हानात्मक असला, तरी त्याचे दडपण झुगारून खेळ करण्याचा इरादा व्यक्त केला. तो म्हणाला, ‘‘आम्ही उपांत्य फेरी गाठू, असे कुणालाही वाटले नव्हते. मोठ्या संघांविरुद्ध सर्वोत्तम खेळ करून आम्ही ही मजल मारली आहे. भारताचे आव्हान लक्षात घेता आम्हाला आणखी एकदा सर्वोत्तम क्रिकेट खेळावे लागणार, याची कल्पना आम्हाला आहे आणि ते आव्हान झेलण्यास आम्ही सज्ज आहोत.’’

मोर्तझाने अनुभवी फलंदाज आणि गोलंदाजीतील विविधता यावर आमची मदार असल्याचे सांगितले. तो म्हणाला, ‘‘आमच्या फलंदाजांनी या वेळी आम्हाला प्रत्येक वेळेस तारले आहे. न्यूझीलंडविरुद्ध विल्यम्सन आणि टेलर असे मोठे फलंदाज खेळत असतानाही आमच्या गोलंदाजांनी त्यांना रोखण्याचा मार्ग शोधला. भारतीय गोलंदाजी लक्षात घेता आम्हाला छोट्या छोट्या भागीदारी रचून पुढे जावे लागेल.’’