विंडीजचा इंग्लंडवर २१ धावांनी विजय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

चेस्टर ली स्ट्रीट (लंडन) - इंग्लंडविरुद्धच्या एकमात्र टी २० सामन्यात विंडीजने २१ धावांनी विजय मिळविला. विंडीजच्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव १५५ धावांत संपुष्टात आला. 

कर्णधाराच्या भूमिकेत असणाऱ्या ब्रेथवेटने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला पराभूत केले. त्याने ३.३ षटकांत २० धावांत ३ गडी बाद केले. त्याला सुनील नारायणने २ गडी बाद करुन साथ दिली. 

शून्यावर जीवदान मिळालेल्या ॲलेक्‍स हेल्सच्या १७ चेंडूतील ४३ धावांच्या खेळीनंतर इंग्लंडचा डाव १ बाद ६४ वरून ४ बाद ६८ असा घसरला. ब्रेथवेटच्या  या धक्‍क्‍यांनंतर सुनील नारायणने १५ धावांत दोन गडी बाद करून इंग्लंडच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. त्यापूर्वी, ख्रिस गेल (४०) एविन लुईस (५१) यांच्या धमाकेदार सुरवातीनंतर शेवटी रिकार्डो पॉवेलच्या फटकेबाजीमुळे विंडीजचे आव्हान उभे राहिले. गेलने २१ चेंडूंत ४० धावांची खेळी करताना तीन चौकार, चार षटकार ठोकले. गेलने टी २० क्रिकेटमध्ये षटकारांचे शतक ठोकण्याचा पराक्रम केला.

स्टॅण्ड कोसळून तिघे जखमी
सामन्यासाठी तात्पुरता उभारलेल्या स्टॅण्डचा काही भाग कोसळून तिघे जखमी झाले, तर २०० प्रेक्षकांची व्यवस्था अन्यत्र करणे भाग पडले. 

संक्षिप्त धावफलक  - 
वेस्ट इंडीज ९ बाद १७६ (ख्रिस गेल ४०, एविन लुईस ५१, लियाम प्लंकेट ३-२७, आदिल रशिद ३-२५) वि.वि. इंग्लंड सर्वबाद १५५ (हेल्स ४३, बटलर ३०, केस्रिक विल्यम्स ३-३५, ब्रेथवेट ३-२०, सुनील नारायण २-१५)