भारताने श्रीलंकेला 291 धावांत गुंडाळले 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 जुलै 2017

गॉल : फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर गोलंदाजांनीही अचूक टप्प्यावर मारा करत श्रीलंकेचा पहिला डाव 291 धावांतच गुंडाळला. गोलंदाजांच्या या भरीव कामगिरीमुळे भारताला पहिल्या डावात 309 धावांची महत्त्वाची आघाडी मिळाली. फॉलो-ऑन देणे शक्‍य असूनही कर्णधार विराट कोहलीने पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

उपुल थरंगा, अँजेलो मॅथ्यूज आणि दिलरुवान परेरा यांचा अपवाद वगळता श्रीलंकेचा एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. मॅथ्यूजने 83, तर परेराने नाबाद 92 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांच्या योजनाबद्ध माऱ्यासमोर श्रीलंकेचे फलंदाज चाचपडतानाच दिसत होते. भारताकडून रवींद्र जडेजाने तीन गडी बाद केले. महंमद शमीने दोन, तर उमेश यादव, आर. आश्‍विन आणि कसोटी पदार्पण करणाऱ्या हार्दिक पांड्याने प्रत्येकी एक गडी बाद केला. 

दुसऱ्या डावात भारताने चांगली सुरवात केली. शिखर धवन आणि अभिनव मुकुंद यांनी चार षटकांत 19 धावांची सलामी दिली. परेराच्या गोलंदाजीवर धवन 14 धावा करून बाद झाला. विशेष म्हणजे, यामध्ये धवनने तीन चौकार मारले होते.