युवराजवरचे दडपण वाढतेय 

वृत्तसंस्था
रविवार, 25 जून 2017

पोर्ट-ऑफ-स्पेन (त्रिनीदाद) : भारत-वेस्ट इंडीज मालिकेतील दुसरा सामना उद्या (ता. 25) होत आहे. शुक्रवारचा पहिला सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. उद्याच्या सामन्याचेही भवितव्य पावसावर अवलंबून असेल. त्याचबरोबर युवराज सिंगचेही भवितव्य पणास लागणार आहे. 

शुक्रवारच्या पहिल्या सामन्यात भारताने 39.2 षटकांत 3 बाद 199 अशी मजल मारल्यानंतर आलेल्या पावसामुळे खेळ पुढे होऊ शकला नाही. या अपूर्ण राहिलेल्या सामन्यात भारताने चांगली सुरवात केली होती. अपवाद होता तो युवराजचा. 
चॅंपियन्स स्पर्धेतील अपयशानंतर आणि युवा संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने युवराजसह धोनीच्याही संघातल्या स्थानावर प्रश्‍नचिन्ह उभे केले. त्यामुळे या दोघा अनुभवी फलंदाजांवरचे दडपण वाढले आहे. युवराजसाठी तर आता प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरणार आहे. 

शिखर धवन आणि अजिंक्‍य रहाणे ही सलामीची जोडी पहिल्याच सामन्यात स्थिरावली आहे. पहिल्या सामन्यात शतकी भागीदारी करून त्यांनी आपले वर्चस्व दाखवून दिले. पुढील सामन्यात या जोडीला लवकर बाद करण्यासाठी विंडीज गोलंदाजांसमोर आव्हान असेल.

पहिल्या सामन्यात शिखरने 87 तर रहाणेने 62 धावा केल्या होत्या. जम बसल्यानंतरही शतकी मजल मारू शकलो नाही, याची खंत या दोघांना असेल.

अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला असल्यामुळे कर्णधार विराट कोहलीकडे संघनिवडीसह सर्वाधिकार आहेत. पहिल्या सामन्यात जडेजाला वगळून चायनामन कुलदीप यादवला संधी देण्यात आली होती. उद्याच्या सामन्यासाठी संघात बदल केले जाण्याची शक्‍यता कमी आहे.