क्रिकेट : न्यूझीलंडच्या ल्युक राँचीने घेतली निवृत्ती

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जून 2017

वेलिंग्टन : न्यूझीलंडचा यष्टिरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज ल्युक राँची याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. ब्रॅंडन मॅकल्लमने यष्टिरक्षण करणे थांबविल्यापासून राँची हा न्यूझीलंडचा नियमित यष्टिरक्षक झाला होता. 

36 वर्षीय राँचीने 85 एकदिवसीय, चार कसोटी आणि 32 ट्‌वेंटी-20 सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले. 2008 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. कसोटीमध्ये पदार्पण करण्यासाठी मात्र त्याला 2015 पर्यंत वाट पाहावी लागली. 2015 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत अंतिम फेरी गाठलेल्या न्यूझीलंड संघामध्येही त्याचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरीही राँची देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आणि 'आयपीएल'सारख्या ट्‌वेंटी-20 स्पर्धांमध्ये खेळणार आहे. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करणे ही माझी स्वप्नपूर्ती होती. 2015 च्या विश्‍वकरंडक स्पर्धा आणि त्यानंतरचे दौऱ्यांमधील अनुभव अविस्मरणीयच आहे. 
- ल्युक राँची 

मैदानावरील राँचीचा उत्साह अफलातून असायचा. संघासाठी तो नि:स्वार्थी भावनेने खेळला. संघासाठी तो कुठलीही भूमिका बजावण्यासाठी सदैव तयार असायचा. राँचीच्या धडाकेबाज फलंदाजीचे नेहमीच कौतुक होते; पण तो तितकाच उत्कृष्ट यष्टिरक्षकही होता, हेदेखील आवर्जून नमूद केले पाहिजे. 
- माईक हेसन, न्यूझीलंडचे प्रशिक्षक