दक्षिण आफ्रिकेतील तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाऐवजी अफगाणिस्तान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

डर्बन - दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ‘अ’ संघांच्या तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाऐवजी अफगाणिस्तान संघांचा समावेश करण्यात आला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाबरोबर सुरू असलेल्या मानधनाच्या वादावरून ऑस्ट्रेलिया अ संघाने दक्षिण आफ्रिकेतील तिंरगी मालिकेत खेळण्यास नकार दिला होता. आयसीसीने अफगाणिस्तान संघाला अलीकडेच कसोटी संघाचा दर्जा दिला आहे. त्यानंतर त्यांचा हा पहिलाच अधिकृत आंतरराष्ट्रीय दौरा असेल. या तिरंगी मालिकेत दक्षिण आफ्रिका आणि भारताचे ‘अ’ संघ सहभागी होणार आहेत.

अफगाणिस्तानने आमचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल आम्ही उत्साहित झालो आहोत. त्यांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यास आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांचे आम्ही यथोचित स्वागत करू, अशी प्रतिक्रिया क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरुन लॉर्गट यांनी सांगितले.