तिसऱ्या सामन्यातही विंडीजचा विजय

पीटीआय
बुधवार, 7 जून 2017

सेंट ल्युसिया - मार्लन सॅम्युएल्सच्या नाबाद ८९ धावांच्या जोरावर विंडीजने तिसऱ्या टी- २० सामन्यातही विजय मिळवत अफगाणिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली. अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १४६ धावा केल्या. विंडीजने १९.२ षटकांत ३ बाद १४७ धावा केल्या. सॅम्युएल्सने ६६ चेंडूंत ९ चौकार, ३ षटकारांसह नाबाद ८९ धावांची खेळी केली. जेसन महंमदने नाबाद २३ धावांचे योगदान दिले. अफगाणिस्तानकडून नूल अली झॅड्रन याने ३५, तर महंमद नाबीने ३८ धावांचे योगदान दिले. विंडीजच्या केस्रिक विल्यम्सने ३४ धावांत ३ गडी बाद केले.