विजयासाठी इंग्लंडला ४७४ धावांचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

नॉटिंगहॅम (लंडन) - दक्षिण आफ्रिका संघाने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडसमोर विजयासाठी ४७४ धावांचे आव्हान ठेवले. त्यानंतर दिवसअखेरीस चार षटकांच्या खेळत इंग्लंडने बिनबाद एक धाव केली होती. के. जेनिगंज आणि ॲलिस्टर कूक शून्यावर खेळत होते.  

दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात आपला दुसरा डाव ९ बाद ३४३ धावसंख्येवर घोषित केला. डीन एल्गर (८०), हशिम आमला (८७) आणि कर्णधार डु प्लेसिस (६३) यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या  डावात भक्कम मजल मारली. हे तिघे बाद झाल्यावर पहिल्या डावाप्रमाणे व्हर्नान फिलॅंडरने(४२) दक्षिण आफ्रिकेची आघाडी वाढवली.

संक्षिप्त धावफलक : द.आफ्रिका ३३५ आणि ९ बाद ३४३ (एल्गर ८०, आमला ८७, डु प्लेसिस ६३, फिलॅंडर ४५, मोईन ४-७८, अँडरसन २-४५, स्टोक्‍स २-३४) वि. इंग्लंड २०५ आणि बिनबाद १