क्रिकेटपेक्षा उद्देश महत्त्वाचा - डू प्लेसिस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

कराची - जागतिक इलेव्हन संघाचा पाकिस्तान दौरा हा केवळ सामन्यांची मालिका नाही, तर त्याच्या आयोजनासाठी असलेला उद्देश महत्वाचा आहे, असे मत जागितक इलेव्हन संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने येथे व्यक्त केले.

कराची - जागतिक इलेव्हन संघाचा पाकिस्तान दौरा हा केवळ सामन्यांची मालिका नाही, तर त्याच्या आयोजनासाठी असलेला उद्देश महत्वाचा आहे, असे मत जागितक इलेव्हन संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने येथे व्यक्त केले.

श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आयसीसीच्या प्रमुख संघांपैकी कुणीही पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. पाकिस्तानातील परिस्थिती बदलल्याचा दावा पाक क्रिकेट मंडळाने केला असून, ते सिद्ध करण्याचा एक भाग म्हणूनच या मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. 
हाच धागा पकडून डू प्लेसिस म्हणाला, ‘‘या मालिकेत केवळ सामने होणार नाहीत, तर ज्या उद्देशाने या मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे हे महत्त्वाचे आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर पाकिस्तानातील क्रिकेट चाहत्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ पहायला मिळणार आहे.’’

जागतिक इलेव्हन संघाला ‘सिक्‍स स्टार’ सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. हा संघ पाकिस्तानात दाखल झाल्यापासून तो सराव किंवा सामन्याला जाईल तेव्हा त्यांचा मार्ग हा पूर्णपणे अन्य वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. अर्थात, हा सुरक्षेचा भाग झाला. आयसीसीने देखील आपले स्वतंत्र सुरक्षा पथक पाठवून तेथील सुरक्षा व्यवस्थेची खातरजमा करून घेतली होती.

आयसीसीचे एक अधिकारी जाईल्स क्‍लार्क म्हणाले, ‘‘पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींच्या संयमाची आम्ही कदर करतो. मी अँडी फ्लॉवरचे आभार मानतो. खेळाडूंना पाकिस्तानात खेळण्यासाठी राजी करण्यात त्याचा वाटा खूप मोठा आहे. ’’
 

या मालिकेच्या अखेरीस आम्ही पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतू शकते हे सिद्ध होईल आणि या घटनाक्रमाचे आम्ही साक्षीदार होतो याचा आम्हाला अभिमान वाटेल.
- अँडी फ्लॉवर, जागतिक संघाचे प्रशिक्षक