गरज असल्यास परत येऊ - ठाकूर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेटच्या अध्यक्षपदाची सूत्रे सर्वोच्च न्यायालयाने काढून घेण्यास भाग पाडलेले माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर पुन्हा ‘बीसीसीआय’ची सेवा करण्यास उत्सुक आहेत. भारतीय क्रिकेटला माझी गरज भासल्यास मी तयार आहे, असे मत त्यांनी मांडले आहे.

ठाकूर सहा महिन्यांपासून भारतीय क्रिकेट प्रशासनातून दूर आहे. खोटे प्रतिज्ञापत्र देण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर त्यांना बिनशर्त माफी मागण्यास सांगितले होते. या माफीनंतर ठाकूर पुन्हा प्रशासनात येण्यात उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी ठाकूर यांना त्यांच्या वाढदिवशी शुभेच्छा देताना माजी कर्णधार सौरभ गांगुलीने, ठाकूर यांनी क्रिकेट प्रशासनात परतावे, असे म्हटले होते. मी अजूनही असा कोणताही विचार केलेला नाही; पण बीसीसीआयला गरज भासल्यास मी तयार आहे, असे त्यांनी सांगितले.