दुसऱ्या दिवशीच भारताचे पूर्ण वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

सहाशे धावांच्या डोंगरासमोर श्रीलंका दिवसअखेरीस ५ बाद १५४
गॉल - भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यावर दुसऱ्या दिवशीच पूर्ण वर्चस्व मिळविले. पहिल्या डावांत ६०० धावांचा डोंगर उभा केल्यावर दुसऱ्या दिवस अखेरीस श्रीलंकेची अवस्था ५ बाद १५४ अशी झाली होती. एंजेलो मॅथ्यूज ५४ आणि दिलरुवान परेरा ६ धावांवर खेळत होता. श्रीलंका अजून ४४६ धावांनी पिछाडीवर आहे.

सहाशे धावांच्या डोंगरासमोर श्रीलंका दिवसअखेरीस ५ बाद १५४
गॉल - भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यावर दुसऱ्या दिवशीच पूर्ण वर्चस्व मिळविले. पहिल्या डावांत ६०० धावांचा डोंगर उभा केल्यावर दुसऱ्या दिवस अखेरीस श्रीलंकेची अवस्था ५ बाद १५४ अशी झाली होती. एंजेलो मॅथ्यूज ५४ आणि दिलरुवान परेरा ६ धावांवर खेळत होता. श्रीलंका अजून ४४६ धावांनी पिछाडीवर आहे.

भारतीय संघाने खऱ्या अर्थाने वर्चस्व राखले. शिखर धवन, चेतेश्‍वर पुजारा (१५३) यांच्या शतकी खेळीनंतर अजिंक्‍य रहाणे (५७) आणि हार्दिक पंड्या (५०) यांच्या उपयुक्त खेळीने भारताला पहिल्या डावात धावांचा डोंगर उभा करता आला. त्यानंतर महंमद शमी (२-३०) आणि उमेश यादव (१-५०) यांच्या सुरवातीच्या गोलंदाजीनंतर फिरकीने केलेली कमाल भारतीयांची ताकद दर्शविणारी ठरली. 

प्रत्युत्तरासाठी उतरलेल्या श्रीलंका संघाला पहिल्याच षटकांत धक्का बसला. उमेश यादवने दिमुथ करुणारत्नेला पायचीत पकडले. लगोलग शमीने एकाच षटकांत दनुष्का गुणतिलका आणि कुशल मेंडिस या दोघांनाही स्लिपमध्ये धवनकरवी झेलबाद केले. या पडझडीत उपुल थरंगा आणि एंजेलो मॅथ्यूज यांनी थोडाफार तग धरला. थरंगाने अधिक सफाईने फलंदाजी करताना ४४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले; पण त्यानंतर फिरकी गोलंदाजांसमोर खेळताना तो अडचणीत आला. सिलीपॉइंटवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या मुकुंदने शिताफीने त्याला धावबाद केले. त्यानंतर अश्‍विनच्या गोलंदाजीवर त्याने डिकवेलाचा झेल टिपला. 

त्यापूर्वी, सकाळच्या सत्रात सुरवातीला नुआन प्रदीपने पुजारा आणि लाहिरू कुमाराने रहाणेला बाद करून भारताला रोखण्याचा प्रयत्न केला. अश्‍विन (४७) आणि वृद्धिमान साहा यांनी सहाव्या विकेटसाठी ५९ धावा जोडून त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. ही जोडी फुटल्यावर रवींद्र जडेजाही लवकर बाद झाला; पण कसोटी पदार्पण करणाऱ्या हार्दिक पंड्या आणि महंमद शमी यांच्या फटकेबाजीने भारताची धावसंख्या फुगली. पंड्याने अर्धशतकी खेळी करताना नवव्या विकेटसाठी शमीसोबत ६९ धावा जोडल्या.

दृष्टिक्षेपात दिवस दुसरा
भारताने गेल्या वर्षभरात पाचव्यांदा सहाशेचा टप्पा गाठला, अन्य संघात केवळ ऑस्ट्रेलिया
भारतीय संघ बरोबर सहाशे धावांवर दुसऱ्यांदा बाद. 
भारताने अकराव्यांदा सहाशे धावा केल्या. त्यात दुसऱ्यांदा श्रीलंकेत
पुजाराने सहाव्यांदा दीडशेचा टप्पा गाठला. बारा शतकात सहा दीडशतके
कसोटी पदार्पणात अर्धशतक करणारा हार्दिक पंड्या २६वा भारतीय खेळाडू

धावफलक
भारत (३ बाद ३९९ वरून पुढे) चेतेश्‍वर पुजारा झे. डिकवेला प्रदीप १५३ (२६५ चेंडू, १३ चौकार), अजिंक्‍य रहाणे झे. करुणारत्ने गो. कुमारा ५७, आर. अश्‍विन झे. डिकवेला गो. प्रदीप ४७, वृद्धिमान साहा झे. परेरा गो. हेराथ १६, हार्दिक पंड्या झे. राखीव खेळाडू गो. कुमारा ५० (४९ चेंडू, ५ चौकार, ३ षटकार), रवींद्र जडेजा त्रि. प्रदीप १५, महंमद शमी झेल थरंगा गो. कुमारा ३०, उमेश यादव नाबाद ११, अवांतर १६, एकूण १३३.१ षटकांत सर्वबाद ६००.
गडी बाद क्रम - ४-४२३, ५-४३२, ६-४९१, ७-४९५, ८-५१७, ९-५७९
गोलंदाजी - नुआन प्रदीप ३१-२-१३२-६, लाहिरू कुमारा २५.१-३-१३१-३, दिलरुवान परेरा ३०-१-१३०-०, रंगना हेराथ ४०-६-१५०-१, दनुष्का गुणतिलका ७-०-४१-०
श्रीलंका पहिला डाव - दिमुथ करुणारत्ने पायचित गो. यादव २, उपुल थरंगा धावबाद ६४, दनुष्का गुणतिलका झे. धवन गो. शमी १६, कुशल मेंडिस झे. धवन गो. शमी ०, एंजेलो मॅथ्यूज खेळत आहे ५४, निरोशान डिकवेला झे. मुकुंद गो. अश्‍विन ८, दिलरुवान परेरा खेळत आहे ६, अवांतर ४, एकूण ४४ षटकांत ५ बाद १५४.
गडी बाद क्रम - १-७, २-६८, ३-६८, ४-१२५, ५-१४३
गोलंदाजी - महंमद शमी ९-२-३०-२, उमेश यादव ८-१-५०-१, आर. अश्‍विन १८-२-४९-१, रवींद्र जडेजा ९-१-२२-०.