पावसाच्या व्यत्ययानंतर भारताचा धुवाधार विजय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

रांची - पावसाच्या व्यत्ययानंतर खडतर आव्हान असताना भारताने ऑस्ट्रेलियाचा तीन चेंडू व नऊ विकेट राखून पराभव केला आणि एकदिवसीय मालिकेपासून मिळवलेले वर्चस्व कायम ठेवले.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला १८.४ षटकांत ११८ धावांत रोखल्यानंतर पावसाचा मोठा व्यत्यय आला. भारताला विजयासाठी ६ षटकांत म्हणजेच ३६ चेंडूत ४८ धावांचे आव्हान मिळाले. भारतीयांनी या धावा एका फलंदाजाच्या मोबदल्यात पार केल्या.

एवढ्या कमी षटकांच्या खेळात जम बसवण्यासाठी उसंत नसते. त्यामुळे रोहित शर्माने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला; परंतु लगेचच तो बाद झाला; मात्र शिखर धवन आणि विराट कोहलीने तडाखा देत विजय साकार केला. विराटने सर्वाधिक २२ धावा फटकावल्या. 

स्टीव स्मिथ दुखापतीमुळे मायदेशी परतला. त्याच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरने नेतृत्व केले.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया १८.४ षटकांत ८ बाद ११८ (फिंच ४२ -३० चेंडू, ४ चौकार, १ षटकार, मॅक्‍सवेल १७ -१६ चेंडू, २ चौकार, बुमराह ३-०-१७-२, कुलदीप ४-०-१६-२) आव्हान ६ षटकांत ४८ धावा पराभूत विरुद्ध भारत ः ५.३ षटकांत १ बाद ४९ (धवन 
नाबाद १५ -१२ चेंडू, ३ चौकार, विराट कोहली २२ -१४ चेंडू, ३ चौकार)